शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
3
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
4
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
5
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
6
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
7
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
8
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
9
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
10
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
11
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
12
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
13
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
14
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

वणव्यांवर रसायन फवारणीचा उतारा, युरोपियन तंत्रज्ञानाचा वापर - गणेश नाईक 

By कमलाकर कांबळे | Updated: January 3, 2025 14:16 IST

वणव्यांमुळे जंगलांचे आणि वन्यजीवांचे नुकसान टाळण्यासाठी युरोपियन देशात वापरल्या जाणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा मनोदय व्यक्त केला आहे...

नवी मुंबई : महाराष्ट्र वनविकास महामंडळ अर्थात एफडीसीएम या शासकीय संस्थेच्या माध्यमातून नैसर्गिक आणि अनैसर्गिक आपत्तींपासून जंगलांचे संवर्धन केले जाते. १९७४ मध्ये स्थापन झालेल्या या महामंडळाच्या कार्यक्षमतेला विविध कारणांमुळे मर्यादा आल्या आहेत.  आता राज्याचे नवनियुक्त वनमंत्री गणेश नाईक यांनी मात्र एफडीसीएमच्या कार्य मर्यादा विस्तारित करण्याचा निर्णय घेतला आहे.  वणव्यांमुळे जंगलांचे आणि वन्यजीवांचे नुकसान टाळण्यासाठी युरोपियन देशात वापरल्या जाणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. 

तीन वेळा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्रिपद भूषविलेल्या गणेश नाईक यांनी १९९५ मध्ये वनमंत्रिपदाची जबाबदारी पार पाडली आहे. या काळात त्यांनी घेतलेले निर्णय आणि विविध कारणांमुळे त्याला आलेले अपयश या पार्श्वभूमीवर वनमंत्रिपदाची आता मिळालेली जबाबदारी तितक्याच निष्ठेने आणि प्रामाणिकपणे पार पाडण्याचा संकल्प त्यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केला. युरोपियन देशात विस्तीर्ण जंगले आहेत.  त्यात वणवा पेटला तर तो विझविण्यासाठी तेथील सरकारने आधुनिक तंत्रप्रणाली विकसित केली आहे. या अंतर्गत हेलिकॉप्टर्समधून रसायन मिश्रित पाण्याचा आगीवर वर्षाव केला जातो. त्यामुळे काही वेळातच वणवा आटोक्यात येतो. हीच प्रणाली महाराष्ट्रात राबविण्याची इच्छा आहे. त्याबाबतचा प्रस्ताव तयार करून लवकरच वित्त मंत्रालयाकडे सादर करणार असल्याचे नाईक यांनी सांगितले. 

जपानबरोबर करार -  रिजनल आणि सिझनल फळांवर प्रक्रिया करून त्यांची निर्यात करण्याच्या दृष्टीने जपानमधील सुमोटो कंपनीबरोबर सामंजस्य करार केला होता. यात एफडीसीएमचा ५१ टक्के तर सुमोटोचा ४९ टक्के समभाग निश्चित केला होता. -  विशेष म्हणजे या खर्चाचा भार सुमोटो कंपनी उचलणार होती.  तर राज्य सरकार फक्त कुशल मनुष्यबळाचा पुरवठा करणार होते.  त्याचबरोबर विदर्भात बांबूपासून लगदा तयार करण्याच्या प्रस्तावावरही सकारात्मक निर्णय झाला होता.-  मात्र, त्यानंतर उद्भवलेल्या राजकीय परिस्थितीमुळे हा  प्रकल्प कागदावरच सीमित राहिला होता. येत्या पाच वर्षांत त्यादृष्टीने नव्याने चाचपणी करणार असल्याचे नाईक यांनी स्पष्ट केले.

वन विभागाला देणार बळतीस वर्षांपूर्वी वन विभागासमोर विविध प्रकारच्या मर्यादा होत्या. विशेषत: त्यांच्याकडे आवश्यक साधने नव्हती. आजही यात फारसा फरक पडलेला नाही. त्यावेळी यासाठी  प्रयत्न केले होते. जागतिक बँकेकडून कर्ज घेण्याचा प्रस्ताव तयार केला होता. मात्र, तो रखडला. आता त्यावर नव्याने कार्यवाही करणार असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :Ganesh Naikगणेश नाईकforestजंगल