शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

आंबेडकरी चळवळीला उजाळा

By admin | Updated: April 15, 2017 03:32 IST

कोकणातील अन्यायकारक खोती पद्धतीविरोधात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लढा उभारला. ही पद्धत रद्द करण्यासाठीचे विधेयक मुंबई असेंबलीमध्ये मांडले. चवदार तळे

- नामदेव मोरे, नवी मुंबई

कोकणातील अन्यायकारक खोती पद्धतीविरोधात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लढा उभारला. ही पद्धत रद्द करण्यासाठीचे विधेयक मुंबई असेंबलीमध्ये मांडले. चवदार तळे, ‘मनुस्मृती’ दहन ही आंदोलनेही याच परिसरामध्ये झाली. बाबासाहेबांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमांमधून या लढ्यांच्या आठवणींनाही उजाळा मिळाला. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नवी मुंबई, पनवेल, उरणसह रायगडमधील प्रत्येक शहर व गावांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. या वेळी आंबेडकरी चळवळीचा प्रवास मांडणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भीमगीतांसह व्याख्यानांच्या माध्यमातूनही चळवळीच्या विविध टप्प्यांवर लक्ष वेधण्यात आले. १९२७मध्ये बाबासाहेब मुंबई विधानपरिषदेवर निवडून गेल्यानंतर त्यांनी कोकणातील अन्यायकारक खोती पद्धतीविरोधात लढ्यास सुरुवात केली. कोकणामध्ये विविध ठिकाणी परिषदांचे आयोजन करून त्यांच्यामध्ये जागृती करण्यात आली. २५ व २६ डिसेंबर १९२७ रोजी महाडमध्ये चवदार तळ्याचे आंदोलन व ‘मनुस्मृती’चे दहन केल्याची चर्चा देशभर झाली. शेतकरी नेते नारायण नागो पाटील यांच्या नेतृत्वाखाली चरी कोपरमध्ये २५ गावांमधील शेतकऱ्यांनी बेमुदत संप पुकारला. जगातील सर्वात मोठ्या संपाला १९३४ मध्ये बाबासाहेबांनी भेट दिली. खोती पद्धत नष्ट करण्यासाठी कायदा करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केले. सप्टेंबर १९३७ मध्ये खोती पद्धत बरखास्त करण्यासाठी मुंबई असेंबलीमध्ये बिल मांडले होते. शहरात मिरवणूक, प्रबोधन फेरी, व्याख्यानाचे आयोजनशहरात प्रबोधन फेरी, सामुदायिक बुद्धवंदना, भव्य मिरवणूक, आरोग्य शिबिर, मोटारसायकल रॅली, निबंध व वर्क्तृत्व स्पर्धा अशा विविध उपक्रमांद्वारे अभूतपूर्व उत्साहात आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. नवी मुंबई महानगरपालिका, पोलीस दल, रिक्षाचालक संघटना, शासकीय इमारती आाणि कायालये, सामाजिक संस्था, शाळा व महाविद्यालयांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सानपाडा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या वतीने सेक्टर ८ परिसरातील हुतात्मा बाबू गेणू मैदान येथे प्रबोधनपर व्याख्यान तसेच शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. भदन्त बोधानंद यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी वसुंधरा कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली ध्वज वंदन, बुद्धवंदना, धम्मदेसना करण्यात आले. संध्याकाळी महामानवांच्या प्रतिमेची भव्य शोभायात्रा काढण्यात आली.नॅशनल इंटीग्रेटी सोशल फाउंडेशनअंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या वतीने जुईनगर सेक्टर २३ येथील गावदेवी मैदानात भीम-बुद्धगीतांच्या प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी दीपक सावंत यांच्या अध्यक्षतेखाली ‘क्रांतीचा वणवा’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात परिसरातील विद्यार्थी, महिलावर्गाला विविध कला सादर करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली होती.रिक्षाचालकांचे रक्तदान सानपाडा रेल्वेस्टेशन बाहेरील नवी मुंबई रिक्षाचालक-मालक संघटना १५ वर्षांपासून शिवजयंती व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती उत्सव साजरा करत आहेत. बाबासाहेबांच्या १२६व्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. रिक्षाचालकांनी रक्तदान करून बाबासाहेबांना अभिवादन केले. रात्री आंबेडकरी चळवळीला उजाळा देणाऱ्या गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघटनेचे अध्यक्ष विनोद जगताप, दिलीप लोखंडे, नंदू शिंदे, सुरेश ठोमरे, राजेंद्र कांबळे, किशोर पकिडे, सर्जेराव पटेकर व इतर सर्व रिक्षाचालकांनी परिश्रम घेतले. डॉ. बाबासाहेबांचे विचार उद्योगक्षेत्राला तारणारे - आर. के. गायकवाड देशातील औद्योगिक क्षेत्रात आर्थिक विषमता आहे. कामगारांचे शोषण, विकासाची गती मंदावली असून, रोजगारासाठी लोक शहराकडे धाव घेत आहेत. त्यामुळे उद्योगांचे व्यवस्थापन करणे कठीण झाले आहे. याकरिता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारताच्या उद्योगक्षेत्राला तारणारे जे विचार दिले आहेत त्याची अंमलबजावणी होणे गरजेचे असल्याचे मत नगरविकास खात्याचे माजी सहसचिव आर. के. गायकवाड यांनी व्यक्त केले. खारघर येथील ‘भारतीय उद्योग व्यवस्थापन आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन केले होते. शेती विकसित होण्यासाठी सामूहिक शेतीचा विचार बाबासाहेबांनी मांडल्याचे विचार या वेळी गायकवाड यांनी व्यक्त केले. सन्मानाने जगण्याची प्रेरणा बाबासाहेबांमुळे मिळालीजीवनात कितीही संकटे आली तरी न डगमगता वाटचाल करण्याची ताकद, तसेच सन्मानाने जगण्याची प्रेरणा व आत्मविश्वास भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिला, असे विचार आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल येथे व्यक्त केले. शुक्र वारी सकाळी बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. या वेळी महापालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर, तहसीलदार दीपक आकडे, बौद्धजन पंचायतचे अध्यक्ष विजय गायकवाड, भीमसैनिक आदी उपस्थित होते. विविध चित्ररथांसह ढोल-ताशांच्या जल्लोषात शहरातून या वेळी मिरवणूक काढण्यात आली.आंबेडकर भवनाचे भूमिपूजनतळोजा : कळंबोलीतील सेक्टर ११ ई येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनाचे भूमिपूजन करण्यात आले. सरकारने या भवनासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर केल्याची माहिती रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष जीवन गायकवाड यांनी दिली. कळंबोली सेक्टर ११ येथे १७०० स्क्वेअर मीटर जागेवर हे भवन उभारण्यात येणार आहे. शुक्रवारी जयंती सोहळ्याचे औचित्य साधून भवनाचा शुभारंभ पार पडला. या वेळी सिडको कळंबोली अधीक्षक अभियंता रोकडे, कार्यकारी अभियंता कापसे, तसेच रिपब्लिकन सेना जिल्हाध्यक्ष जीवन गायकवाड, भीमशक्ती संघटनेचे अध्यक्ष सुभाष गायकवाड, रिपब्लिकन सेना कंळबोली शहराध्यक्ष विनोद गायकवाड, संजय सोनावणे व इतर मान्यवर उपस्थित होते.