शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

विमानतळ बाधित प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन, लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2020 02:11 IST

प्रलंबित प्रश्न मार्गी लागेपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार केला असून, प्रकल्पग्रस्तांनी मंगळवारी भीख मांगो आंदोलन केले.

नवी मुंबई : विमानतळ बाधित प्रकल्पग्रस्तांनी ३० दिवसांपासून सिडको भवनसमोर मुक्काम मोर्चा सुरू केला आहे. प्रलंबित प्रश्नमार्गी लागेपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार केला असून, प्रकल्पग्रस्तांनी मंगळवारी भीख मांगो आंदोलन केले.अखिल भारतीय किसान सभेच्या अंतर्गत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कमिटीने हे आंदोलन सुरू केले आहे. ३० दिवस सिडको भवनसमोर मुक्काम करून व सहा दिवस आमरण उपोषण करूनही अद्याप एकही प्रश्न मार्गी लागलेला नाही. यामुळे मंगळवारी या लढ्यात सहभागी झालेल्या महिलांनी भीख मागो आंदोलन केले. सिडको व कोकण भवन परिसरामध्ये भिक मागून जमलेली रक्कम सिडकोला देण्यात येणार आहे. सिडको हे राज्यातील श्रीमंत महामंडळापैकी एक असून, प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविले जात नसल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. आमरण उपोषणामध्ये १३ जणांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी काहींची प्रकृती खालावली असल्यामुळे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलविले असून, अद्याप आठ जण आंदोलनात सहभागी आहेत. मुक्काम मोर्चामध्ये शेकडो प्रकल्पग्रस्त सहभागी झाले असून, यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय आहे.शून्य पात्रता व अपात्र पद्धत बंद करून सरसकट सर्वांना पुनर्वसन पॅकेज लागू करावे. जोपर्यंत सिडको प्रकल्पग्रस्तांचे सर्व प्रश्न सोडवत नाही, तोपर्यंत सिडको प्रकल्पग्रस्तांचे कोणतेही बांधकाम तोडू नये. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे बाधित झालेल्या मच्छीमार व्यावसायिकांना २०१ च्या कायद्याप्रमाणे नुकसानभरपाई द्यावी व सर्व युवक, युवतींना नोकरी उपलब्ध करून द्यावी. प्रकल्पग्रस्तांचे घर बांधून होईपर्यंत बाजारभावाप्रमाणे घरभाडे देण्यात यावे. प्रकल्पग्रस्तांना वाढीव बांधकाम खर्च २५०० रुपये द्यावा, अशा मागण्या आंदोलकांनी केल्या असून सर्व मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवले जाणार आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईAirportविमानतळ