शहरं
Join us  
Trending Stories
1
‘हिंडेनबर्ग’ने भारतीयांच्या स्वप्नांवरच घातला घाला; गौतम अदानींचं भागधारकांना पत्र, म्हणाले...
2
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
3
आजचे राशीभविष्य- २५ सप्टेंबर २०२५, प्रगतीच्या संधी चालून येतील, आर्थिक लाभ होईल
4
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
5
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
6
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
7
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
8
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
9
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
10
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
11
"माझ्या बेडरुममध्ये ये, तुला परदेशात फिरायला घेऊन जातो"; स्वयंघोषित बाबानं केला १७ मुलींचा छळ
12
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
13
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे
14
विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
15
मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
16
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
17
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
18
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
19
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
20
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ

विमानतळबाधित मच्छीमारांनाही हवा मोबदला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 00:32 IST

सिडको प्रशासनाची वाढली डोकेदुखी; कोळी बांधव आक्रमक; ‘त्या’ गावांच्या स्थलांतराच्या मार्गात नवा पेच

नवी मुंबई : आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाने वेग घेतला आहे. प्रकल्पपूर्व कामांचा धडाका सुरू आहे. विमानतळाच्या मार्गात प्रमुख अडथळा ठरणाऱ्या उलवे टेकडीच्या उत्खननाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सध्या गावांच्या स्थलांतराचा प्रश्न काही प्रमाणात शिल्लक आहे. या प्रश्नांवर तोडगा निघण्यापूर्वीच मोबदल्याच्या मागणीसाठी आता या क्षेत्रातील मच्छीमारांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यामुळे सिडकोची डोकेदुखी वाढली असून, त्याचा फटका आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाला बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.देशातील पहिले ग्रीन फिल्ड विमानतळ म्हणून नवी मुंबई विमानतळाची उभारणी करण्यात येणार आहे. जवळपास २,२२६ हेक्टर जागेवर हे विमानतळ उभारण्यात येणार आहे. तर वैमानिक क्षेत्राची जागा ११६० हेक्टर इतकी असणार आहे. यापैकी सिडकोच्या ताब्यात १५७२ हेक्टर जागा आहे. तर उर्वरित ६७२ हेक्टर जागा संपादित करायची आहे. या संपूर्ण प्रकल्पाला २७ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. या विमानतळाची १० दशलक्ष प्रवासी वाहतुकीची क्षमता असून पहिल्या टप्प्याचे काम डिसेंबर २०१९ सालापर्यंत पूर्ण करण्याचा सिडकोचा मानस आहे. त्या दृष्टीने कामाला गती दिली आहे.विमानतळ प्रकल्पासाठी ६७१ हेक्टर जमीन संपादित करायची आहे. त्यासाठी दहा गावे विस्थापित होणार आहेत. या विस्थापितांच्या पुनर्वसनासाठी सिडकोच्या वतीने आकर्षक पॅकेज तयार करण्यात आले आहे. जमिनीचा भूसंपादन मोबदला म्हणून एकूण २२.५ टक्के विकसित भूखंड देण्यात आले आहेत. तर स्थलांतरित होणाºया दहा गावांना त्यांच्या मूळ जमिनीच्या तिप्पट जागेसह बांधकाम खर्च व इतर सुविधा दिल्या आहेत. त्याचप्रमाणे समाजमंदिरे, शाळा, खेळाची मैदाने आदीसाठी भूखंड देण्यात आले आहेत. विमानतळ निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीने या गावांचे स्थलांतर होणे गरजेचे आहे. त्यानुसार आतापर्यंत सहा गावांतील ९५ टक्के ग्रामस्थांनी स्थलांतर केले आहे; परंतु उर्वरित चार गावांतील ग्रामस्थांनी स्थलांतराला विरोध दर्शविला आहे. त्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न सिडकोस्तरावर सुरू आहेत. हा प्रश्न सुटण्याअगोदरच परिसरातील मच्छीमारांनी मागण्यांचा रेटा मागे लावला आहे, त्यामुळे सिडकोसमोर नवीन पेच निर्माण झाला आहे.स्थलांतरित होणाºया दहा गावांतील बहुतांशी ग्रामस्थांचा मच्छीमारी हा पारंपरिक व्यवसाय आहे; परंतु विमानतळ प्रकल्पामुळे हा व्यवसाय संपुष्टात येणार आहे. ही गावेच स्थलांतरित होणार असल्याने मच्छीमारीही कायमस्वरूपी बुडित निघणार आहे. या पार्श्वभूमीवर येथील पारंपरिक मच्छीमारांनाही पुनर्वसनाचा लाभ द्यावा, अशी मागणी कोळी समाज नवतरुण मच्छीमार संघटनेने सिडकोकडे लावून धरली आहे. विशेष म्हणजे, या मागणीसाठी संघटनेचा मागील दोन वर्षांपासून पाठपुरावा सुरू आहे. पशुधन, दुग्ध व मत्स्य विकास मंत्री महादेव जानकर यांच्याबरोबर या संदर्भात अनेक बैठकाही झाल्या; परंतु तोडगा काहीच निघाला नाही. त्यामुळे येथील कोळी बांधव हवालदिल झाले आहेत. आपल्या मागण्यासाठी आता कोळी बांधवांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने सिडकोसमोर नवीन आव्हान उभे आहे.सिडको अध्यक्षांना साकडेस्थलांतर होणाºया दहा गावांपैकी उलवे, वाघिवली, कोंबडभुजे व गणेशपुरी या चार गावांतील ९0 टक्के ग्रामस्थांचा व्यवसाय मच्छीमारी हाच आहे; परंतु विमानतळ प्रकल्पामुळे हा व्यवसाय बुडित निघणार आहे. शिवडी-सीलिंक उभारताना एमएमआरडीएने प्रस्थापित होणाºया कोळी बांधवांना नुकसानभरपाई दिली आहे. किमान त्या धर्तीवर आम्हालाही नुकसानभरपाई मिळावी, अशी या परिसरातील कोळी बांधवांची मागणी आहे. या मागणीसाठी आता संघटनेने सिडकोचे अध्यक्ष तथा पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांना साकडे घातले आहे. पुढील आठ दिवसांत एक बैठक बोलावून त्या संदर्भात सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन ठाकूर यांनी दिले आहे.मच्छीमारी हा पारंपरिक व्यवसाय बुडित निघणार आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाला आमचा विरोध नाही; परंतु आम्हालाही न्याय मिळाला पाहिजे. आमचे अनेक तरुण सुशिक्षित आहेत. नुकसानभरपाईबरोबच त्यांच्या नोकरीचाही विचार सिडकोने करावा.- राहुल कोळी,अध्यक्ष,कोळी समाज नवतरुण मच्छीमार संघटना

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईAirportविमानतळ