शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
4
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
5
गुजरात पोलिसांची मोठी कावाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
6
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
7
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
8
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
9
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
10
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
11
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
12
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
13
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
14
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
15
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
16
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
17
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
18
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
19
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
20
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा

वायू प्रदूषणावर महापालिकेकडून एअर क्लिनिंगचा सोपस्कार! बोनकोडे, कोपरीतील रहिवाशांचा कोंडतोय श्वास

By कमलाकर कांबळे | Updated: October 11, 2023 18:44 IST

या भागात पहाटे आणि रात्रीच्या वेळी हवेत मोठ्या प्रमाणात धुके दिसत आहे. त्यातून उग्र वास येत असल्याने रहिवाशांचा श्वास कोंडत आहे.

नवी मुंबई : राहण्यायोग्य सर्वोत्तम शहर म्हणून मानांकन प्राप्त झालेल्या नवी मुंबई शहरातील प्रदूषणाची पातळी वाढली आहे. विशेषत: वायू प्रदूषणात मागील पंधरा दिवसांत कमालीची वाढ झाली आहे. शहराच्या प्रत्येक भागात प्रदूषणाची समस्या असली तरी त्याचा सर्वाधिक त्रास वाशी सेक्टर २६, कोपरी आणि बोनकोडे गाव आणि परिसरातील रहिवाशांना होत आहे. या भागात पहाटे आणि रात्रीच्या वेळी हवेत मोठ्या प्रमाणात धुके दिसत आहे. त्यातून उग्र वास येत असल्याने रहिवाशांचा श्वास कोंडत आहे.

वातावरणातील दूषित धुलिकणामुळे सकाळी व्यायामाला जाणाऱ्या रहिवाशांना त्रास जाणवत आहे. कोपरी, बोनकोडे, सेक्टर ११ आणि वाशी सेक्टर २६, २८ परिसरातील रहिवाशांना प्रदूषणाचा कायमस्वरूपी त्रास आहे. या विरोधात येथील रहिवाशांचा मागील अनेक वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. एमआयडीसीतील अनेक कारखान्यांतून प्रक्रिया न करताच रसायन मिश्रित सांडपाणी नाल्यांत सोडून दिले जाते. हा नाला बोनकोडे आणि कोपरी या दोन गावांना विभागून पुढे खाडीकडे जातो. या नाल्यांच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात नागरी वसाहती आहेत. 

नाल्यातून वाहणाऱ्या रसायन मिश्रित सांडपाण्यामुळे परिसरात उग्र दर्प येत आहे. तसेच प्रदूषित वायू हवेत सोडून दिला जातो. त्यामुळे परिसरातील प्रदूषणात वाढ होत आहे. महापालिका आणि प्रदूषण मंडळाकडून प्रदूषण रोखण्यासाठी अयशस्वी प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मागील हवेतील दूषित धुलिकण सुगंधित करण्यासाठी रात्रीच्या वेळी महापालिकेच्या माध्यमातून नाल्याच्या परिसरात एअर क्लिनिंगसाठी फवारणी केली जात आहे. परंतु हे उपायसुद्धा तुटपुंजे ठरले आहेत. कारण कोपरी, बोनकोडे, वाशी सेक्टर २६ आणि २८ या परिसरात पहाटेच्या वेळी हवेतील धुलिकणांमुळे वातावरण धूरकट झाल्याचे दिसून येते. त्यामुळे सकाळी मॉर्निंग वॉकला जाणारे रहिवासीसुद्धा आरोग्याच्या दृष्टीने धास्तावले आहेत.

स्वच्छ हवेसाठी रहिवाशांचे अभियानकोपरी आणि परिसरातील वाढत्या प्रदूषणाचा विषय गंभीर बनला आहे. त्यामुळे येथील रहिवासी आक्रमक झाले आहेत. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघत नाही, तोपर्यंत प्रत्येक रविवारी एक तास ठिय्या आंदोलन करण्याचा निर्धार रहिवाशांनी केला आहे. गेल्या रविवारपासून या अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे. ‘स्वच्छ हवा, हा माझा अधिकार’ या संकल्पनेवर आधारित हे अभियान संबंधित शासनाचे लक्ष वेधण्यासाठी असून, त्यावर निर्णायक तोडगा निघेपर्यंत ते सुरूच राहील, असे नवी मुंबई विकास अधिष्ठानचे अध्यक्ष संकेत डोके यांनी स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई