शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

निर्यात बंदीनंतर डाळिंबाची पहिली खेप अमेरिकेसाठी रवाना

By नारायण जाधव | Updated: July 27, 2023 21:30 IST

नवी मुंबई :-डाळिंबाच्या दाण्यामध्ये फळ माशीचा प्रादूर्भाव झाल्यामुळे 2018 पासून अमेरिकेने भारतीय डाळिंबाच्या निर्यातीवर बंदी आणली होती.  त्यानंतर केंद्र ...

नवी मुंबई :-डाळिंबाच्या दाण्यामध्ये फळ माशीचा प्रादूर्भाव झाल्यामुळे 2018 पासून अमेरिकेने भारतीय डाळिंबाच्या निर्यातीवर बंदी आणली होती.  त्यानंतर केंद्र सरकार, प्लांट कॉरंटाईन इंडिया यांनी  अमेरिकेच्या कृषी विभागाशी चर्चा करून ही निर्यात बंदी उठवावी यासाठी प्रयत्न सुरू केले होते. या प्रयत्नांमुळे 2022 पासून ही निर्यात बंदी उठविण्यात आली. मात्र त्यासाठी काही नियम आणि अटी घालण्यात आल्या आहेत. त्यानुसार डाळिंबाच्या विकेंद्रीकरणाची प्रकिया करून गुरूवारी प्रायोगिक तत्त्वावर डाळिंबाचे 450 खोके म्हणजे 150 किलो डाळिंब विमानाने अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे पाठविण्यात आले. 

नवी मुंबईतल्या तुर्भे इथल्या अपेडा कार्यालयाच्या जनरल मॅनेजर विनिता सुधांशू यांनी या गाडीला हिरवा झेंडा दाखविला. यावेळी मुंबई प्रादेशिक विभागाचे उपमहाव्यवस्थापक नागपाल लोहकरे, मुंबई विभागाचे प्रमुख ब्रजेश मिश्रा, कृषी पणन मंडळाचे मिलिंद जोशी, चेरमन अभिषेक देव, अपेडाच्या जनरल मॅनेजर विनिता सुधांशू , उपसंचालक ब्रिजेश मेहता, अमेरिकेच्या इन्सपेक्टर डॅग्नी वॅझेक्युझ, विकीरण सुविधा केंद्र प्रमुख सतिश वाघमोडे, निर्यातदार पंकज खंडेलवाल, डाळींब संशोधन केंद्र  सोलापूर चे डॉ. निलेश गायकवाड, डॉ. जी पी सिंग, एन.आर सीचे संचालक डॉ.मराठे, महाराष्ट्र स्टेट ॲग्रीक्लचर मार्केटीग बोर्डचे संचालक संजय कदम, आय एन आय फॉम मुंबईचे संचालक पंकज खंडेवाल आदी उपस्थित होते.

या निर्यातीनंतर अमेरिकेतील मोठी बाजारपेठ खुली होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. भारतीय डाळिंबात कर्करोगापासून लढण्यासाठी लागणारे अॅन्टीऑक्सीडंट आहेत. तिथल्या त्वचेच्या विकारांवरील उपचारासाठी असणाऱ्या मार्गदर्शक डाएट मध्ये डाळिंबाचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे अमेरिकेत डाळिंबाला मोठी मागणी आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्निया डाळिंबाच्या जातीपेक्षा भारतीय डाळिंबाच्या जातीला जास्त मागणी आहे. भारतीय डाळिंबांनी ही बाजारपेठ काबीज केल्यानंतर डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचे अपेडाचे मुंबई प्रादेशिक विभागाचे उपमहाव्यवस्थापक यांनी सांगितले.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईAmericaअमेरिका