शहरं
Join us  
Trending Stories
1
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
2
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा
3
IPL 2025: लखनौच्या अडचणीत वाढ, दुखापतीमुळं मयांक यादव आयपीएलमधून बाहेर!
4
Shiv Sena: पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील संशयितांची माहिती देणाऱ्याला १० लाख रुपयांचे बक्षीस
5
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
6
बिहार दौऱ्यात राहुल गांधी यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल, पोलिसांनी शंभराहून अधिक जणांना केलं आरोपी
7
India Pakistan Ceasefire: "भारत-पाकिस्तान यांच्यात १८ मेपर्यंत शस्त्रसंधी"; पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री डार यांचे विधान
8
आधी ट्रम्प यांच्यावर भडकली, नंतर पोस्ट डिलीट; कंगना म्हणाली, "जेपी नड्डांनी डिलीट करायला सांगितली"
9
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
10
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
11
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
12
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
13
'गदर'मधला दरम्यान सिंग आठवतोय का? एका आजारामुळे झालं होत्याचं नव्हतं, अभिनेत्याचा झाला दुर्देवी शेवट
14
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
15
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
16
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
17
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
18
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
19
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग
20
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...

श्रद्धावासीयांना ३० वर्षांनंतर मिळाला न्याय

By admin | Updated: April 13, 2017 03:02 IST

वाशीतील श्रद्धा गृहनिर्माण सोसायटीच्या पुनर्बांधणीसाठी सिडकोने ना हरकत दाखला दिला आहे. यामुळे मोडकळीस आलेल्या शहरातील सर्वच इमारतींच्या पुनर्बांधणीसाठी

नवी मुंबई : वाशीतील श्रद्धा गृहनिर्माण सोसायटीच्या पुनर्बांधणीसाठी सिडकोने ना हरकत दाखला दिला आहे. यामुळे मोडकळीस आलेल्या शहरातील सर्वच इमारतींच्या पुनर्बांधणीसाठी बांधकाम परवाना मिळण्यासाठीचा शेवटचा अडसर दूर झाला आहे. श्रद्धा संक्रमण शिबिरात राहणारे ११२ व धोकादायक इमारतीमध्ये राहणाऱ्या २५६ कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. सिडकोच्या या निर्णयामुळे मोडकळीस आलेल्या इमारतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांचा ३० वर्षांपासूनचा प्रश्न मार्गी लागला असून, रहिवाशांनी आनंदोत्सव साजरा केला आहे. सिडकोने दिलेल्या ना हरकत प्रमाणपत्रामुळे जवळपास तीन दशके धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. नवी मुंबईची उभारणी करताना सिडकोने १९८५ मध्ये वाशीमध्ये श्रद्धा गृहनिर्माण सोसायटीची उभारणी केली. मुंबईमधील झोपडपट्टी व लहान घरे विकून अनेक सर्वसामान्य नागरिकांनी या सोसायटीमध्ये घरे विकत घेतली. पण प्रत्यक्षात पहिल्याच दिवसापासून समस्यांना सामोरे जावे लागले. पावसाळ्यात गळती सुरू झाली. काही वर्षांमध्ये इमारती धोकादायक ठरल्या. अतिधोकादायक इमारतीमधील ११२ कुटुंबांना जुईनगरमधील संक्रमण शिबिरामध्ये हलविण्यात आले आहे. १६ वर्षांपासून संक्रमण शिबिरामध्ये राहणाऱ्या अनेक मूळ मालकांचा मृत्यू झाला आहे. संक्रमण शिबिराची इमारतही धोकादायक ठरल्याने आता जायचे कुठे, असा प्रश्न निर्माण झाला होता. जवळपास ३० वर्षांपासून येथील रहिवासी व नगरसेवक किशोर पाटकर पुनर्बांधणीसाठी सिडको, महापालिका व राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत आहेत. हजारो लेखी पत्रे, मोर्चे, सरकारी कार्यालयांच्या पायऱ्या झिजविल्यानंतर व आंदोलने केल्यानंतर शासनाने फेब्रुवारी २०१५ मध्ये अडीच एफएसआय मंजूर केला. पण या निर्णयाला दोन वर्षे झाल्यानंतरही एकाही इमारतीच्या पुनर्बांधणीचे काम सुरू झाले नाही. सिडकोने ना हरकत दाखला दिल्यानंतरच बांधकाम परवानगी दिली जाईल, अशी भूमिका महापालिकेने घेतल्याने सर्वच प्रकल्प रखडले होते. अखेर सिडकोने ना हरकत प्रमाणपत्र देण्याचे मान्य केले आहे.सिडकोचे सह संचालक राजेंद्र चव्हाण यांच्या हस्ते १२ एप्रिलला रहिवाशांना ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आले. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी युद्धपातळीवर निर्णय घेतल्याने हे शक्य झाले आहे. सिडकोचे ना हरकत प्रमाणपत्र मिळालेली श्रद्धा पहिली सोसायटी असली तरी याचा लाभ अतिधोकादायक ठरलेल्या १८५ गृहनिर्माण सोसायट्या, व्यापारी संकुल व इतर बांधकामांना होणार आहे. वाशीमध्ये ८७ धोकादायक सोसायट्या असून त्यामध्ये ३०० पेक्षा जास्त इमारतींचा समावेश आहे. नेरूळमध्येही मोठ्या प्रमाणात नागरिक मोडकळीस आलेल्या इमारतींमध्ये वास्तव्य करत आहेत. सिडकोने घेतलेल्या निर्णयामुळे त्या सर्वांना दिलासा मिळाला असून त्यांना त्यांच्याच घराच्या मोबदल्यात त्याच ठिकाणी मोठे प्रशस्त घर मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला असल्याने रहिवाशांनी आनंद साजरा केला आहे. भूषण गगराणी यांची सकारात्मक भूमिका सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकपदावर भूषण गगराणी यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी प्रलंबित सर्व प्रश्न सोडविण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. विमानतळाचा प्रकल्प मार्गी लावतानाच घणसोली हस्तांतरणासह इतर अनेक कामे मार्गी लावली आहेत. धोकादायक इमारतीमधील रहिवाशांवरील मृत्यूचे सावट दूर करण्यासाठी त्यांनी पुनर्बांधणीसाठी ना हरकत परवानगी देण्याचा निर्णय घेतला व श्रद्धा सोसायटीला पहिली परवानगी देऊन प्रत्यक्षात अंमलबजावणीही केली आहे. उर्वरित ८ प्रस्तावांनाही ना हरकत प्रमाणपत्र लवकरच देण्यात येणार असल्याने नागरिकांनी त्यांचे आभार मानले आहेत. श्रद्धामधील रहिवाशांचा तीन दशकांचा प्रवास - १९८५ मध्ये ३६८ कुटुंबीयांनी श्रद्धामधील घरांचा घेतला ताबा- पहिल्याच पावसाळ्यामध्ये घरांमध्ये गळती व इतर समस्या सुरू - इमारती धोकादायक ठरल्याने ११२ कुटुंबांना जुईनगरमध्ये संक्रमण शिबिरामध्ये हलविण्यात आले- घर घेतलेल्या पहिल्या वर्षापासून तब्बल ३२ वर्षे सिडकोसह शासनाकडे पाठपुरावा - पुनर्बांधणीची प्रतीक्षा करताना आतापर्यंत १७ नागरिकांचा झाला मृत्यू - जीव मुठीत धरून २५६ कुटुंबीयांचे धोकादायक इमारतीमध्येच वास्तव्य- फेब्रुवारी २०१५ मध्ये अडीच एफएसआयला शासनाची परवानगी- सिडको एनओसी नसल्याने बांधकाम परवानगीला विलंब- २२ फेब्रुवारी २०१७ सिडकोने ना हरकत प्रमाणपत्र देण्याचे केले मान्य- १२ एप्रिल २०१७ रोजी श्रद्धा गृहनिर्माण सोसायटीच्या पुनर्बांधणीला ना हरकत प्रमाणपत्राचे वितरण श्रद्धा व इतर मोडकळीस आलेल्या इमारतींमधील रहिवाशांना न्याय मिळवून देण्यासाठी दोन दशकांपासून आम्ही शासन, सिडको व महापालिकेकडे पाठपुरावा करत आहोत. अडीच एफएसआयसह पुनर्बांधणीमध्ये येणारे अडथळे दूर करण्यासाठी शेकडो वेळा शासकीय कार्यालयांमध्ये फेऱ्या मारल्या आहेत. हजारो पत्रे, सह्यांची निवेदने व आंदोलन केले. सिडकोने पुनर्बांधणीसाठी ना हरकत प्रमाणपत्र दिल्याने पुनर्बांधणीच्या मार्गातील अडथळे दूर झाले असून आता पालिकेने विनाविलंब बांधकाम परवानगी देऊन नागरिकांना दिलासा द्यावा. - किशोर पाटकर, नगरसेवक, वाशी नोकरी करत असताना कर्ज घेऊन श्रद्धा सोसायटीमध्ये घर घेतले होेते. परंतु इमारत धोकादायक ठरल्याने आम्हाला घर सोडून दुसरीकडे जाऊन राहावे लागले. अनेक वर्षांपासून शासकीय यंत्रणांकडे पाठपुरावा करत आहोत. सिडकोने ना हरकत प्रमाणपत्र दिल्याने सर्वांना आनंद झाला आहे. - शांताराम जावळे, रहिवासी, श्रद्धा सोसायटी