शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षाचालकांचा संप अखेर मागे, खारघरमधील प्रवाशांना २० दिवसांनंतर दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 06:48 IST

मागील २० दिवसांपासून हद्दीच्या वादावरून सुरू असलेला खारघरमधील रिक्षाचालकांचा संप अखेर मागे घेण्यात आला. शेकापचे आमदार बाळाराम पाटील आणि माजी आमदार विवेक पाटील यांच्या मध्यस्थीनंतर दोन्ही रिक्षा संघटनांनी समन्वयाची भूमिका घेत संप मागे घेतला.

लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : मागील २० दिवसांपासून हद्दीच्या वादावरून सुरू असलेला खारघरमधील रिक्षाचालकांचा संप अखेर मागे घेण्यात आला. शेकापचे आमदार बाळाराम पाटील आणि माजी आमदार विवेक पाटील यांच्या मध्यस्थीनंतर दोन्ही रिक्षा संघटनांनी समन्वयाची भूमिका घेत संप मागे घेतला.खारघर शहरातील रिक्षा स्टॅण्डवरून हा वाद विकोपाला गेला होता. खारघर स्थानकावर झालेल्या हाणामारीत दोन्ही संघटनेचे रिक्षाचालक जखमी झाले होते. त्यामुळे एकता रिक्षा संघटनेच्या पदाधिकाºयांनी रिक्षा बंद आंदोलन पुकारले होते. या प्रकरणात सहायक पोलीस आयुक्त, प्रादेशिक परिवहन अधिकारी, आमदार प्रशांत ठाकूर यांनीही मध्यस्तीची भूमिका घेतली होती. यासंदर्भात दोन बैठकाही पार पडल्या होत्या; परंतु त्यानंतरही रिक्षांचा संप सुरूच राहिल्याने खारघरमधील प्रवाशांचे हाल सुरू होते. याची गंभीर दखल घेत पनवेल प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिणी पाटील यांनी शुक्र वारी ७२ रिक्षाचालकांना परवाने रद्द करण्यासंदर्भात कारणे दाखवा नोटीस बजावली. अखेर या वादावर तोडगा काढण्यासाठी रविवारी आमदार बाळाराम पाटील व विवेक पाटील यांनी दोन्ही संघटनांच्या पदाधिकाºयांना एकत्रित बोलावून बैठक बोलावली. या दरम्यान खारघर रेल्वेस्थानकासह कळंबोली, कामोठे अशा तीन ठिकाणी बैठका पार पडल्यानंतर या दोन्ही संघटनांत स्टॅण्डचे वाटप करून या प्रकरणी मार्ग काढण्यात आला. या वेळी उपस्थितांमध्ये नगरसेवक गुरु नाथ गायकर, नगरसेवक हरेश केणी, संतोष तांबोळी, नगरसेवक अजीज पटेल, एकता संघटनेचे अध्यक्ष केसरीनाथ पाटील, तसेच तळोजा येथील रिक्षा संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.नवीन रिक्षा स्टॅण्डचे असे झाले वाटपखारघरमधील खारघर एकता रिक्षाचालक संघटना ही आपल्या जुन्या जागी असलेल्या स्टॅण्डवर आपल्या रिक्षा उभ्या करून व्यवसाय करतील. तर तळोजा रिक्षा संघटना हे खारघर रेल्वेस्थानकाजवळ सबवे शेजारी, तसेच डी-मार्ट, प्रणाम हॉटेल, वास्तुविहार, सेक्टर ७ बिकानेर या ठिकाणी आपले रिक्षा स्टॅण्ड उभारून व्यवसाय करतील, असे ठरले.

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसNavi Mumbaiनवी मुंबई