शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

ड्रग्ज तस्करीत आता आफ्रिकनचा सहभाग; तिघांकडून सव्वा कोटीचे अमली पदार्थ जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 06:16 IST

११ जणांचे बेकायदा वास्तव्य

नवी मुंबई : गुन्हे शाखा पोलिसांनी गुरुवारी पहाटे ११ ठिकाणी छापे मारून एक कोटी १० लाखांचे अमली पदार्थ जप्त केले. या प्रकरणी तिघा आफ्रिकन नागरिकांना अटक केली असून, त्यात दोन पुरुष व एक महिला आहे. त्याशिवाय बेकायदेशीर वास्तव्य करणारे ११ जण पोलिसांच्या हाती लागले असून, त्यांना देश सोडण्याची नोटीस बजावली आहे. ड्रग्जविरोधी मोहिमेंतर्गत उलवेत कोम्बिंग ऑपरेशन राबवून पोलिसांनी ही कारवाई केली.

नवी मुंबईत ड्रग्जविरोधी अभियान प्रभावीपणे सुरू आहे. त्याच अनुषंगाने पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे, अपर आयुक्त दीपक साकोरे आदींच्या नेतृत्वाखाली उलवे परिसरातील आफ्रिकन व्यक्तींच्या हालचालीवर अमली पदार्थ विरोधी पथकाकडून पाळत ठेवली होती. त्यातून सहायक आयुक्त भाऊसाहेब ढोले यांनी वरिष्ठ निरीक्षक संदीप निगडे यांच्या माध्यमातून गुरुवारी पहाटे परिसरात कोम्बिंग ऑपरेशन राबवले. 

उलवे पोलिसांत गुन्हा १२५ अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पथक केले होते. त्यांनी उलवे परिसरात आफ्रिकन व्यक्तींचे वास्तव्य असलेल्या ११ ठिकाणी धडक दिली. यावेळी प्रत्येक विदेशी व्यक्तीकडे कागदपत्रांची चौकशी करून त्यांच्या साहित्याची झाडाझडती घेण्यात आली. यामध्ये तिघांकडे एक कोटी १० लाखांचे अमली पदार्थ मिळून आले. त्यात ५९ लाख २४ हजारांचे ११८.४८ ग्रॅम कोकेन, ५० लाख ४२ हजारांचे १००.८४ ग्रॅम एमडी व ४३ हजारांच्या रोकडचा समावेश आहे. या तिघांवर उलवे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

३५ आफ्रिकन व्यक्तींची पोलिसांनी केली चौकशीपोलिसांना ३५ आफ्रिकन व्यक्तींच्या चौकशीत ११ जणांचा व्हिजा संपलेला असतानाही ते बेकायदेशीर वास्तव्य करीत असल्याचे आढळले. या विदेशी नागरिकांना आश्रय देणाऱ्या घरमालकांनी पोलिसांना कळविले होते का हे पडताळून तसे झाले नसल्यास घरमालकांवर गुन्हे दाखल होणार आहेत. 

ठाण्यातून तिघांना अटकदाेन काेटींच्या मेफेड्राॅन (एमडी) ड्रग्जच्या तस्करीसाठी डायघर भागात आलेल्या सैफ अली खान, अमन खान आणि इलियाज खान या तीन तस्करांना अटक केल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखेने दिली. त्यांच्याकडून तब्बल एक हजार १०० ग्रॅम वजनाचे एमडी हस्तगत केले. डायघर भागात एमडी ड्रग्ज विक्रीसाठी काही जण येणार असल्याची माहिती अमली पदार्थ विराेधी पथकाचे वरिष्ठ पाेलिस निरीक्षक गाेरखनाथ घार्गे यांना मिळाली हाेती. त्यानुसार पथकाने १२ फेब्रुवारीला सायंकाळी कारवाई केली.

टॅग्स :Drugsअमली पदार्थ