शहरं
Join us  
Trending Stories
1
महसूल मंत्र्यांचा दुय्यम निबंधक कार्यालयातच छापा; अधिकाऱ्यांच्या ड्रॉवरमध्ये आढळले पैसे
2
सरन्यायाधीशांवर वकिलाकडून बूट फेकण्याचा प्रयत्न ; ‘सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही’ अशा घोषणा देत कोर्ट सुरू असतानाच केला हल्ला 
3
कोणत्या नगरपरिषद, नगरपंचायतीसाठी कोणते आरक्षण; सोडत निकाल वाचा एका क्लिकवर... 
4
वांगचूक यांना अटक; केंद्र सरकार, लडाखला नोटीस; तत्काळ सुटका करण्याची सर्वोच्च न्यायालयात मागणी 
5
बिहार विधानसभेचा बिगुल अखेर वाजला; दोन टप्प्यांत मतदान, तर १४ नोव्हेंबरला निकाल   
6
मुंबई महापालिकेची अंतिम प्रभागरचना मंजूर; निवडणूक प्रक्रियेला वेग, मतदार याद्यांची प्रतीक्षा 
7
२४७ नगरपरिषदांमध्ये १२५ नगराध्यक्षपदे महिलांसाठी; तर १४७ नगरपंचायतींमध्ये ७३ महिलांसाठी राखीव 
8
ब्रुनको, रॅम्सडेल व साकागुची यांना मेडिसिनचे नोबेल; टी-पेशींचा शोध, कर्करोग आणि मधुमेहावर उपयुक्त
9
७ कोटींच्या घरांना ग्राहक मिळाले नाहीत, तर म्हाडा घरे भाड्याने देणार
10
लादेनच्या डोक्यात अमेरिकी नेव्ही सीलनेच गोळी झाडली होती, हे इतिहास विसरणार नाही : ट्रम्प
11
तरुणाई ठरवणार बिहारचा मुख्यमंत्री?
12
विशेष न्यायालयाचा दोघांची सुटका करण्यास नकार; बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण, सरकारी वकिलांची माहिती  
13
अपहरण केले, पण चांगले खायला दिले; दिलीप खेडकरचा असाही बचावात्मक पवित्रा
14
परप्लेक्सिटीचा तांत्रिक बिघाड सोडवला, १ कोटीची नोकरी मिळाली; पालघर जिल्ह्यातल्या जितेंद्रची झाली निवड
15
पालकांचा सांभाळ मुलांनी केलाच पाहिजे; बक्षिसपत्राविषयी उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
16
अतिवृष्टीचे निकष बदलून शेतकऱ्यांना करणार मदत; बुजलेल्या विहिरींनाही मदतीचा प्रस्ताव
17
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
18
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
19
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
20
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम

उघड्यावरच प्रातर्विधी

By admin | Updated: September 23, 2015 10:12 IST

स्वच्छ भारत मिशन अभियानांतर्गत प्रत्येक घरात शौचालय असावे, या उद्देशाने ठाणे महापालिकेने झोपडपट्टीभागातील १ लाख १२ हजार २३८ घरांचा सर्व्हे केला

स्वच्छ भारत मिशन अभियानांतर्गत प्रत्येक घरात शौचालय असावे, या उद्देशाने ठाणे महापालिकेने झोपडपट्टीभागातील १ लाख १२ हजार २३८ घरांचा सर्व्हे केला असून त्यामध्ये ७० हजार २५८ घरे ही शौचालयांचा वापर करीत नसल्याची बाब समोर आली आहे. तर ६ हजार ९६८ कुटुंबे म्हणजे प्रत्येक कुटुंबात पाच माणसे पकडली तर आजच्या घडीला तब्बल ४८ हजार जण उघड्यावर प्रात:विधासाठी जात असल्याची माहिती यातून समोर आली आहे. 
 
ठाणे महापालिकेच्या घनकचरा विभागामार्फत जून महिन्यात हा सर्व्हे सुरु झाला असून सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात र्तो पूर्ण झाला असून यासाठी पालिकेने २00 कर्मचारी नियुक्त केले होते. त्यांच्यामार्फत हे काम केवळ झोपडपट्टी भागात सुरु होते. त्यानुसार आता प्रत्येक प्रभाग समितीमधील सर्व्हे १00 टक्के पूर्ण झाल्याचा दावा पालिकेने केला आहे. महापालिका हद्दीत आजच्या घडीला ११,२१७ सार्वजनिक शौचालये आहेत. त्यावरच अधिक भर दिला जात असून वैयक्तिक शौचालये वापरणार्‍यांची संख्या कमी असल्याची माहिती यातून पुढे आली आहे. शौचालय उभारण्यासाठी केंद्र शासनाकडून ४ हजार आणि राज्य शासनाकडून ८ हजारांचे अनुदान आधारकार्ड संलग्न असलेल्या संबंधित व्यक्तीच्या बँक खात्यात जमा होणार आहे. परंतु, हा भरणा दोन टप्प्यांत केला जाणार असून पहिल्या टप्प्यात शौचालयाचे अर्धे काम केले जाणे आवश्यक असून त्यानुसारच दुसर्‍या टप्प्याचा निधी दिला जाणार आहे. ज्यांच्याकडे शौचालये नाहीत, त्यांना ते बांधण्यासाठी प्रोत्साहित केले जाणार आहे. तसेच ते बांधताना दोन पीट टँक असणे आवश्यक असणार आहे. काही भागांत मलनि:सारण वाहिन्या टाकल्या असल्याने त्यांना टँक उभारणे बंधनकारक असणार नाही. परंतु, याशिवाय वैयक्तिक शौचालय उभारताना संबंधित रहिवाशांच्या येथे जागा आहे अथवा नाही, याची पाहणी केली गेली आहे. 
 
१ काही भागांत मलनि:सारण वाहिन्या टाकल्या असल्याने त्यांना टँक उभारणे बंधनकारक असणार नाही. परंतु, याशिवाय वैयक्तिक शौचालय उभारताना संबंधित रहिवाशांच्या येथे जागा आहे अथवा नाही, याची पाहणी केली गेली आहे.
२ त्यानुसार पालिकेने बैठ्या घरांचे १ लाख १२ हजार २३८ घरांचे सर्व्हेक्षण पूर्ण केले असून त्यातील ४१ हजार ७८० घरांमध्ये शौचालय असल्याची माहिती या सर्व्हेतून पुढे आली आहे. तर, ७० हजार ७८० घरांमध्ये शौचालये नसल्याची माहिती यातून समोर आली आहे. पैकी ३०९२ घरे ही सामुहिक शौचालयचा वापर करीत असून उर्वरित ६० हजार १९८ घरे ही सार्वजनिक शौचालयांचा वापर करीत आहेत. 
 
३ ठाणे महापालिका या ६९६८ कुटुंबासाठी ज्या पध्दतीने जागा उपलब्ध असतील त्यानुसार वैयक्तीक, सामुहिक अथवा सार्वजनिक शौचालये उपलब्ध करुन देणार आहे. दुसरीकडे आतापर्यंत ७ हजार ५०२ रहिवाशांनी शौचालय उभारणीसाठी पालिकेकडे अर्ज सादर केले आहेत. त्यांची छाननी करून पालिका पुढील कार्यवाही करणार आहे.