शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

लेटलतिफ कर्मचाऱ्यांवर कारवाई, १०२ कर्मचाºयांना दिली कारणेदाखवा नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 05:13 IST

महानगरपालिका मुख्यालयामध्ये उशिरा येणा-या कर्मचा-यांवर आयुक्तांनी कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. शुक्रवारी तब्बल १०२ अधिकारी, कर्मचारी उशिरा आल्याचे निदर्शनास आले असून, सर्वांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे.

नवी मुंबई - महानगरपालिका मुख्यालयामध्ये उशिरा येणाºया कर्मचाºयांवर आयुक्तांनी कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. शुक्रवारी तब्बल १०२ अधिकारी, कर्मचारी उशिरा आल्याचे निदर्शनास आले असून, सर्वांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे. विभागनिहाय उशिरा येणाºयांचा अहवालही तयार करण्यात आला आहे.नवी मुंबई महापालिका आयुक्त रामास्वामी एन. यांनी पदभार स्वीकारल्यानंतर कर्मचाºयांनी शिस्तीचे पालन करावे, वेळेवर कामावर हजर राहावे, याविषयी सूचना दिल्या होत्या. कामामध्ये हलगर्जी करणाºयांवर कारवाई करण्याचा इशाराही दिला होता. महापालिकेमधील कंत्राटी कामगार, अग्निशमन जवान यांच्या वेतनवाढीसह पदोन्नतीचे प्रश्नही सोडविले आहेत. अधिकारी, कर्मचाºयांचे प्रश्न सोडविल्यानंतर सर्वांनी वेळेत काम करणे अपेक्षित असताना अनेक जण वेळेत कामावर येत नसल्याचे लक्षात आले. शुक्रवारी आयुक्तांनी स्वत: प्रवेशद्वारावर थांबून उशिरा येणाºयांना लॉबीमध्येच थांबण्याच्या सूचना केल्या. तब्बल १०२ कर्मचारी उशिरा आल्याचे निदर्शनास आले. आयुक्तांनी अचानक केलेल्या कारवाईमुळे महापालिकेमध्ये खळबळ उडाली. कर्मचाºयांच्या रांगा लागल्याचे चित्र पाहावयास मिळाले होते. उशिरा येणाºया सर्वांवर कारवाई करण्याच्या सूचना प्रशासन उपआयुक्त किरणराज यादव यांना दिल्या. यादव यांनी सर्वांना कारणे दाखवा नोटीस दिल्या आहेत.महापालिका आयुक्तांनी उशिरा येणाºया कर्मचाºयांचा अहवाल तयार केला आहे. कोण उशिरा येऊन लवकर निघून जातात, कोणते कर्मचारी उशिरापर्यंत काम करत असतात, या सर्वांचा तपशील संकलित केला आहे. अनेक दिवसांपासून याविषयी कार्यवाही सुरू होती. हा अहवाल संबंधित विभाग प्रमुखांना देण्यात आला आहे. यापुढे कोणीही उशिरा आल्यास किंवा कामामध्ये कुचराई केल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.महापालिका मुख्यालयात वेळेत येणाºया अधिकारी व कर्मचाºयांची पाहणी करण्यात आली. जे कर्मचारी उशिरा आले त्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे. कर्मचाºयांचा अहवालही तयार करण्यात आला असून, तो प्रत्येक विभागप्रमुखांना देण्यात येणार आहे. कामकाजामध्ये शिस्त यावी यासाठी ही कार्यवाही करण्यात आली आहे.- रामास्वामी एन.आयुक्त,नवी मुंबई महापालिका

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई