सिडकोची सुरक्षारक्षकांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 01:04 AM2018-04-24T01:04:18+5:302018-04-24T01:04:18+5:30

१२ प्रकल्पग्रस्तांच्या दगडखाणीचा परवानाही रद्द करण्याची कारवाई सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी केली आहे.

Action on CIDCO Security | सिडकोची सुरक्षारक्षकांवर कारवाई

सिडकोची सुरक्षारक्षकांवर कारवाई

Next

कमलाकर कांबळे ।
नवी मुंबई : सिडकोच्या सेवेत राहून ही आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाला अप्रत्यक्षपणे विरोध करणाऱ्या ४७ प्रकल्पग्रस्त सुरक्षारक्षकांची सिडकोने सेवा खंडित केली आहे. त्याचबरोबर १२ प्रकल्पग्रस्तांच्या दगडखाणीचा परवानाही रद्द करण्याची कारवाई सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी केली आहे.
देशाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम प्रगतिपथावर आहे. सध्या दहा गावांच्या स्थलांतराचा प्रश्न कळीचा बनला आहे. दहा गावांतील ३००० कुटुंबांपैकी आतापर्यंत जवळपास १००० कुटुंबांनी स्थलांतरण केले आहे. उर्वरित कुटुंबांना मे २०१८ ची अंतिम मुदत देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, स्थलांतरित होणाºया या दहा गावांतील अनेक तरुण विविध पदावर सिडकोच्या सेवेत आहेत. त्यामुळे सेवेचा लाभ घेणाºया प्रकल्पग्रस्तांनी सर्वप्रथम आपली घरे स्थलांतरित करावीत, अशी सिडकोची भूमिका आहे; परंतु सेवेचा लाभ ही घ्यायचा आणि सिडकोच्या धोरणाला विरोधही करायचा, अशा दुहेरी भूमिकेत वावरणाºया कर्मचाºयांची सिडकोने झडाझडती सुरू केली आहे. याचाच एक भाग म्हणून सोमवारी ४७ सुरक्षारक्षकांची सेवा तडकाफडकी खंडित करण्यात आली. हे सर्व सुरक्षारक्षक स्थलांतरित होणाºया दहा गावांतील रहिवासी आहेत. १५ दिवसांपूर्वी सिडकोचे मुख्य दक्षता अधिकारी विनय कारगांवकर यांनी या सुरक्षारक्षकांना बोलावून घरे रिकामी करा, किंवा नोकरी सोडा, असा सल्ला दिला होता. सुरक्षारक्षकांशी संवाद साधतानाचा कारगांवकर यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली होती; परंतु सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी कारगांवकर यांची पाठराखण करीत त्यांच्या भूमिकेचे समर्थन केले होते. इतकेच नव्हे, तर सेवेत राहून सिडकोच्या प्रकल्पांना आणि धोरणाला विरोध करणाºया कर्मचाºयांची गय केली जाणार नाही, असा इशारा दिला होता. त्यानुसार सोमवारी त्या ४७ सुरक्षारक्षकांची सिडकोतील सेवा खंडित करून त्यांना पुन्हा सुरक्षारक्षक मंडळाकडे वर्ग करण्यात आले आहे. कर्तव्यात कसूर, वरिष्ठांच्या आदेशाचा अवमान करणे, गोपनीयतेचा भंग आणि सिडकोच्या ध्येयधोरणांशी अप्रामाणिक वर्तनाचा ठपका ठेवून, या सुरक्षारक्षकांवर ही कारवाई करण्यात आली आहे.

१२ दगडखाणीचे परवाने केले रद्द
पुनर्वसनाचा एक भाग म्हणून सिडकोने प्रकल्पग्रस्तांना उलवे परिसरात दगडखाणीचे परवाने दिले आहेत. यातील बहुतांशी प्रकल्पग्रस्त स्थलांतरीत होणाºया दहा गावांतील आहेत. त्यामुळे या दगडखाण मालकांनी प्राधान्याने स्थलांतराचा मार्ग स्वीकारावा आणि इतरांनाही प्रोत्साहित करावे, असे सिडकोला वाटते.
सिडकोने दिलेल्या दगडखाणीही चालवायच्या आणि स्थलांतराला विरोधही करायचा, अशी दुहेरी भूमिका काही दगडखाणचालकांनी घेतल्याचे सिडकोच्या निदर्शनास आले. त्यानुसार सोमवारी या परिसरातील प्रकल्पग्रस्तांच्या १२ दगडखाणीचे परवाने रद्द करण्यात आल्याची माहिती गगराणी यांनी ‘लोकमत’ला दिली. या कारवाईतून बेशिस्तपणा खपवून घेतला जाणार नसल्याचे सिडकोने स्पष्ट केले आहे.

Web Title: Action on CIDCO Security

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :cidcoसिडको