शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

लाच घेताना सिडकोच्या महाव्यवस्थापकावर कारवाई; लाचलुचपत प्रतिबंध विभागाची कारवाई

By सूर्यकांत वाघमारे | Updated: August 29, 2023 18:26 IST

दहा हजार रुपयांची लाच घेताना सिडकोच्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आली आहे.

नवी मुंबई : दहा हजार रुपयांची लाच घेताना सिडकोच्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आली आहे. नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंध विभागाने मंगळवारी दुपारी सापळा रचून ही कारवाई केली. घराच्या फर्स्ट पार्टी डिड ऑफ अपार्टमेंटवर सही करण्यासाठी पैसे मागण्यात आले होते.

जगदीश राठोड (५३) असे कारवाई करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव असून ते प्रशासन विभागाचे महाव्यवस्थापक आहेत. त्यांच्याकडे ऐरोली विभागाचा देखील अतिरिक्त कार्यभार आहे. ऐरोली मधील एका घराच्या फर्स्ट पार्टी डिड ऑफ अपार्टमेंट कागदपत्रावर सही करण्यासाठी त्यांनी लाच मागितल्याची तक्रार एका इस्टेट एजंटने लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे केली होती.

त्यानुसार उप अधीक्षक शिवराज म्हेत्रे यांच्या पथकाने मंगळवारी दुपारी सीबीडी येथील सिडको भवन मध्ये सापळा रचण्यात आला होता. त्यामध्ये दहा हजार रुपये घेताना राठोड यांच्यावर कारवाई करण्यात आली. याप्रकरणी सीबीडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. 

टॅग्स :cidcoसिडकोPoliceपोलिस