शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
2
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं"
3
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: भाषेच्या नावाखाली गुंडगिरी सहन करणार नाही - उद्धव ठाकरे
4
जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
5
मराठीचा विजयी मेळावा, ठाकरे बंधू येणार एकत्र, ऐतिहासिक सभेला सुप्रिया सुळेसुद्धा राहणार उपस्थित
6
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
7
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
8
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
9
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
10
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."
11
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
12
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
13
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
14
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
15
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
16
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
17
Ashadhi Ekadashi 2025 Wishes: आषाढी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Messages आणि भक्तिपूर्ण Greetings पाठवा आपल्या प्रियजनांना!
18
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
19
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
20
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे

नवी मुंबईत २०८२ चालकांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 23:24 IST

नववर्षाची सुरुवात गुन्ह्याने; ३८५ जणांना ‘थर्टीफर्स्टची नशा’ भोवली; वाहतूक पोलिसांची धडक मोहीम

नवी मुंबई : थर्टीफर्स्टच्या रात्री मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या ३८५ जणांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यापैकी ३४० कारवाई वाहतूक पोलिसांकडून तर ४५ कारवाई स्थानिक पोलिसांकडून करण्यात आल्या आहेत. तर वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी १६९७ चालकांवर कारवाई करण्यात आली आहे.थर्टीफर्स्टच्या रात्रीत नवी मुंबई पोलिसांनी एकूण २०८२ वाहनचालकांवर कारवाई केली आहे. त्यामध्ये ड्रंक अ‍ॅण्ड ड्राइव्हच्या ३८५ तर इतर कायद्यांतर्गत १६९७ चालकांविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. मागील काही वर्षांपासून थर्टीफर्स्टला उत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यातच मद्यपान करून थर्टीफर्स्ट साजरा करण्याकडेही तरुणांचा कल वाढत चालला आहे; परंतु मद्यपान केल्यानंतर वाहने चालवल्याने अपघाताच्या घटना घडण्याची दाट शक्यता असते. तर मागील काही वर्षांत अशा घटनांमध्ये जीवितहानीही झालेल्या आहेत. त्यामुळे थर्टीफर्स्ट साजरा करत असताना मद्यापन करून वाहने चालवू नयेत, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येते. यानंतरही नियम तोडणाऱ्यांवर कारवाईच्या उद्देशाने पोलिसांकडून थर्टीफर्स्टला ड्रंक अ‍ॅण्ड ड्राइव्हच्या कारवाई केल्या जातात. त्यानुसार मंगळवारी संध्याकाळपासून ते बुधवारी पहाटेपर्यंत पोलीस आयुक्तालय क्षेत्रात अशा प्रकारच्या कारवाई सुरू होत्या. त्याकरिता पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात ६२ हून अधिक ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती. त्यामध्ये ४४ ठिकाणी परिमंडळ पोलिसांचा, तर १८ ठिकाणी वाहतूक पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता. वाहतूक शाखा उपायुक्त सुरेश लोखंडे, परिमंडळ उपायुक्त पंकज डहाणे, अशोक दुधे यांच्या मार्गदर्शनाखाली ही पथके तयार करण्यात आली होती. त्यांच्याकडून पामबीच मार्ग, कळंबोली जंक्शन यासह शहरातील महत्त्वाचे रहदारीचे रस्ते, चौक त्या ठिकाणी बंदोबस्त लावण्यात आला होता. त्या ठिकाणी संशयित वाहनांची झाडाझडती घेतली जात होती. त्याशिवाय दुचाकी व कारचालकांची ब्रेथालायझर मशिनद्वारे मद्यपान केले आहे का? याचीही चाचणी घेण्यात आली. त्यामध्ये मद्यपान केल्याचे निष्पन्न होणाºया चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यानुसार दोन्ही परिमंडळमधून ३८५ वाहनचालकांवर ड्रंक अ‍ॅण्ड ड्राइव्हच्या कारवाई करण्यात आल्या आहेत. त्यांच्याविरोधात स्थानिक पोलीसठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.वाहन अपघातांच्या घटनांना आळा घालण्याच्या उद्देशाने गतवर्षापासून पोलिसांकडून वाहनचालकांमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतुकीच्या नियमांबाबात जनजागृती केली जात आहे. त्याशिवाय नियमित कारवाई करून अथवा इतर उपक्रमांद्वारेही वाहतुकीच्या नियमांची माहिती दिली जात आहे. यानंतरही कायद्याची पायमल्ली करणाºयांचे प्रमाण कमी होत नसल्याचे दिसून येत आहे. अशा १६९७ जणांवर विविध कलमांतर्गत पोलिसांनी थर्टीफर्स्टच्या एका रात्रीत कारवाई केली आहे.प्रतिवर्षी थर्टीफर्स्टच्या रात्री पोलिसांकडून ड्रंक अ‍ॅण्ड ड्राइव्हच्या कारवाई केल्या जातात. त्यानुसार २०१८ मध्ये ४२४ चालकांवर, तर २०१९ मध्ये ३५३ चालकांवर ड्रंक अ‍ॅण्ड ड्राइव्हच्या कारवाई करण्यात आल्या होत्या. यानंतर यंदाचा थर्टीफर्स्ट साजरा करणाºयांकडून मद्यपान करून वाहन चालवणे टाळले जाणे अपेक्षित असतानाही तसे झाले नाही. परिणामी, नाकाबंदीत ३८५ चालक मद्यधुंद अवस्थेत आढळून आल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आलीब्रेथालायझर मशिनची कमतरताड्रंक अ‍ॅण्ड ड्राइव्हच्या कारवार्इंसाठी ६२ हून अधिक ठिकाणी वाहतूक तसेच शहर पोलिसांतर्फे नाकाबंदी करण्यात आली होती. त्यांच्याकडून ब्रेथालायझर मशिनद्वारे चाचणी घेतली जात होती. मात्र, अनेक ठिकाणी मशिनची कमतरता पडल्याने अथवा त्या बंद पडल्याने पोलिसांच्या कारवाईत अडथळा निर्माण झाला होता. या वेळी वाहनचालकाच्या तोंडाचा वास घेऊन पोलिसांना चाचणी करावी लागत असल्याचे दिसून आले; परंतु अशा प्रकारच्या चाचणीत आरोग्याचा धोका असल्याची भीती पोलिसांकडून वर्तवली जात होती.मदतीसाठी तरुणाईचा उपक्रमनेरुळमधील दत्तगुरू ग्रुपच्या वतीने तरुण सहा वर्षांपासून ३१ डिसेंबरला रात्रभर पोलिसांना मदत करत आहेत. ‘एक रात्र आपल्या पोलिसांसाठी’ या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. वाशी ते बेलापूर दरम्यान पामबीच रोडवर रात्रभर पोलिसांना पाणी, बिस्कीट व चहाचे वाटप केले. याशिवाय फुले देऊन पोलिसांचे स्वागत केले. या उपक्रमामध्ये नीलेश दौंडकर, हेमंत पोमण, स्वप्निल पानसरे, धनंजय शर्मा, अजय तळेकर, संतोष जाधव, सिद्धेश चोरगे, माजी सैनिक राऊत सर व इतरांनी सहभाग घेतला होता.शेकोटीचा आधारथर्टीफर्स्टच्या अनुषंगाने पोलिसांकडून सर्वत्र चोख बंदोबस्त लावण्यात आला होता. त्यानुसार पामबीच मार्गावरही पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता. मात्र, आठवड्यापासून शहरातल्या तापमानाचा पारा घसरला असून, तो २० डीग्रीपर्यंत पोहोचला आहे. यामुळे पामबीच मार्गावर थर्टीफर्र्स्टच्या बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना शेकोटीचा आधार घ्यावा लागला.