शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ध्वनिप्रदूषण करणा-या १९ मंडळांवर कारवाई, विसर्जनादरम्यान नियमांचे उल्लंघन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 05:39 IST

विसर्जनादरम्यान डी.जे. अथवा डॉल्बी वाजवून ध्वनिप्रदूषण करणा-या १९ गणेशोत्सव मंडळांवर परिमंडळ पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यामध्ये सर्वाधिक कारवाया वाशी विभागात झाल्या आहेत.

नवी मुंबई : विसर्जनादरम्यान डी.जे. अथवा डॉल्बी वाजवून ध्वनिप्रदूषण करणाºया १९ गणेशोत्सव मंडळांवर परिमंडळ पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यामध्ये सर्वाधिक कारवाया वाशी विभागात झाल्या आहेत. पोलिसांनी सूचना करूनही नियमांचे उल्लंघन करून मोठ्या आवाजात ध्वनिक्षेपक वाजवल्याप्रकरणी या मंडळांवर गुन्हे दाखल केले आहेत.गणरायाच्या विसर्जनादरम्यान डी.जे. अथवा डॉल्बी वाजवून ध्वनिप्रदूषण होणार नाही याची काळजी पोलिसांकडून घेण्यात आली आहे. त्याकरिता सर्वच गणेशोत्सव मंडळांना न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्याच्या सूचना गणेशोत्सवापूर्वीच पोलिसांनी केल्या आहेत. यानंतरही काही मंडळांकडून पोलिसांच्या सूचनांना बगल देण्याचे प्रकार घडत आहेत. परिमंडळ १मधील अशा १९ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांवर पोलिसांनी कारवाया केल्या आहेत. श्रीगणेशाच्या विसर्जनादरम्यान मर्यादेपेक्षा जास्त आवाजाने ध्वनिक्षेपक वाजवल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाया केल्या असल्याचे उपआयुक्त डॉ. सुधाकर पठारे यांनी सांगितले. या सर्व मंडळांवर स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यात सर्वाधिक कारवाया वाशी पोलिसांनी केल्या आहेत. वाशी पोलीस ठाणे ९, एपीएमसी, रबाळे, रबाळे एमआयडीसी व सीबीडी पोलीस ठाण्यात प्रत्येकी १ तर नेरूळ पोलीस ठाण्यात ४ व कोपर खैरणे पोलीस ठाण्यात २ गुन्हे दाखल आहेत. अशीच कारवाई अनंत चतुर्दशीच्या दिवशी होणाºया विसर्जनापर्यंत सुरूच राहणार आहे. विसर्जनाची प्रक्रिया शांततेत व शिस्तबद्ध व्हावी याकरिता पोलीस प्रयत्नशील आहेत. यादरम्यान ध्वनिप्रदूषण होणार नाही याची खबरदारीही मंडळांनी घेणे गरजेचे आहे. तशा सूचनादेखील पोलिसांनी केल्या आहेत. यानंतरही नियमांचे उल्लंघन करणाºयांवर कारवाईच्या उद्देशाने पोलीस ठाणे अंतर्गत पथके तयार करण्यात आली आहेत. विसर्जनस्थळाच्या मार्गावर जाणाºया प्रत्येक गणेशोत्सव मंडळाकडून वाजवल्या जाणाºया ध्वनिक्षेपकाच्या आवाजाची मर्यादा तपासली जात आहे.

टॅग्स :Crimeगुन्हा