शहरं
Join us  
Trending Stories
1
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
2
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
3
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
4
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
5
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
6
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
7
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
8
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
9
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
10
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
11
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
12
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
13
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
14
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?
15
Solapur Crime: 'तुला आणि तुझ्या आईला खल्लास करीन'; बापाकडूनच अल्पवयीन मुलीवर अनेकवेळा अत्याचार
16
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका
17
नागपूर: 'चॅट जीपीटी'च्या मदतीने पोलिसांनी पकडला मास्टरमाईंड; पुण्यातील व्यक्तीच्या घरावर घेतलं कर्ज, ५ कोटींचा गंडा
18
Ganesh Chaturthi 2025: मराठी कलाकारांच्या घरी झाले बाप्पाचे आगमन, पाहा फोटो
19
जैशला पुनरुज्जीवित करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न; मसूदच्या दहशतवाद्यांसाठी काय करतंय पाक सरकार?
20
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल

विनाहेल्मेट १,३०० दुचाकीस्वारांवर कारवाई, वाहतूक पोलिसांची पामबीच मार्गावर मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2021 13:46 IST

Navi Mumbai : पामबीच मार्गावर वेगात कार पळवल्या जात असल्याच्या तक्रारी वाहतूक पोलिसांकडे प्राप्त होत होत्या. त्याद्वारे अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी वाहतूक पोलिसांनी पामबीच मार्गावरील सीसीटीव्ही तपासून ६ स्पोर्ट्स कारचालकांवर दंडात्मक कारवाई केली आहे.

नवी मुंबई : पामबीच मार्गावर विनाहेल्मेट दुचाकी चालवणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांनी शुक्रवारी कारवाई केली. त्यामध्ये १३०० दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात आली असून, स्पोर्ट्स कारच्या रेस लावणाऱ्या ६ गाड्यांवर देखील कारवाई करण्यात आली आहे. यापुढेही वाहतूक पोलिसांकडून अशा प्रकारे मोहीम राबवून कारवाया केल्या जाणार आहेत.पामबीच मार्गावर वेगात कार पळवल्या जात असल्याच्या तक्रारी वाहतूक पोलिसांकडे प्राप्त होत होत्या. त्याद्वारे अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी वाहतूक पोलिसांनी पामबीच मार्गावरील सीसीटीव्ही तपासून ६ स्पोर्ट्स कारचालकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. हे कार चालक एकत्र जमून इतर वाहनचालकांना धोका निर्माण करून वेगात कार पळवायचे. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी वाहतूक शाखा पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांनी शुक्रवारी पामबीच मार्गावर विशेष मोहीम राबवली. त्यासाठी उपायुक्त कराड, सहायक आयुक्त दत्ता तोटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलिसांची विविध पथके तयार करण्यात आली होती. त्यामध्ये १३०० दुचाकीस्वारांवर विनाहेल्मेट वावरताना आढळून आले. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

अपघातांचे प्रमाण वाढल्याने निर्णयविना हेल्मेट दुचाकी स्वारांची संख्या दिवसेंदिवस वाढली आहे, तसेच अपघातांचेही प्रमाण वाढले आहे. हेल्मेट परिधान न केल्यास जीवितहानी होण्याचीही शक्यता असते. याचमुळे पोलिसांकरवी ही कारवाई करण्यात येत आहे. 

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसNavi Mumbaiनवी मुंबई