शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

विकासकामांमध्ये पक्षपात होत असल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2019 23:46 IST

पाठपुरावा करूनही प्रभागामधील विकासकामे मार्गी लागत नाहीत.

नवी मुंबई : पाठपुरावा करूनही प्रभागामधील विकासकामे मार्गी लागत नाहीत. प्रशासनाकडून फक्त आश्वासने मिळत असून प्रत्यक्ष कामे होत नसल्याबद्दल नगरसेवकांनी स्थायी समितीमध्ये स्पष्ट नाराजी व्यक्त केली आहे. कामे करताना पक्षपात केला जात असल्याचा आरोपही या वेळी करण्यात आला.नवी मुंबई महापालिकेच्या सर्वसाधारण सभा व स्थायी समितीमध्ये दोन महिन्यांपासून जास्तीत जास्त विकासकामांचे प्रस्ताव मार्गी लावण्यासाठीची घाई सुरू आहे. अनेक प्रभागांमधील प्रस्ताव मंजूर झालेले नसून त्याचे पडसाद मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेमध्ये उमटले. कोपरखैरणेमधील शिवसेना नगरसेविका मेघाली राऊत यांनी त्यांच्या प्रभागामध्ये कामे होत नसल्याचे निदर्शनास आणून दिले. आम्ही चार वर्षांपासून अनेक कामांसाठी वारंवार पाठपुरावा करत आहोत; पण प्रशासनाकडून फक्त आश्वासने दिली जात आहेत. अ‍ॅड. भारती पाटील यांनीही कामे होत नसल्याचे निदर्शनास आणून दिले. आम्ही सनदशीर मार्गाने पाठपुरावा करत असतो; पण प्रशासनाकडून कामे केली जात नाहीत. आमच्या प्रभागामधील प्रस्ताव कधी चर्चेला येणार अशी विचारणाही त्यांनी या वेळी केली. डॉ. जयाजी नाथ यांनीही, विकासकामांची फाइल एक टेबलवर किती दिवस थांबलेली असते, याची माहिती घेतली जावी, आम्ही सभागृहात आवाज उठवितो त्यामुळे आमची कामे होत नाहीत का, असेही त्यांनी या वेळी विचारले.सभागृहनेते रवींद्र इथापे यांनी प्रशासनाला धारेवर धरले. पूर्वीच्या आयुक्तांनी ज्या कामांची पाहणी केली. त्या कामांसाठीही पुन्हा जागेवर जाऊन पाहणी करायची आवश्यकता आहे का? किती प्रस्ताव मंजुरीसाठी शिल्लक आहेत. याची पाहणी करावी व बुधवारी ते प्रस्ताव मंजुरीसाठी आणावे, अशा सूचना दिल्या. सभापती नवीन गवते यांनीही शहर अभियंता सुरेंद्र पाटील यांना सर्वांची कामे झाली पाहिजेत, अशा सूचना दिल्या.>७१ कोटींच्या कामांना मंजुरीस्थायी समितीमध्ये मंगळवारी तब्बल ७१ कोटी रुपयांच्या विकासकामांना मंजुरी देण्यात आली. यामध्ये रोडचे डांबरीकरण, पदपथ दुरुस्ती व इतर कामांचा समावेश आहे. नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर शहर अभियंता सुरेंद्र पाटील यांनी, जास्तीत जास्त कामे करण्याचा प्रयत्न सुरू असून सहा महिन्यांत अडीच हजार कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी दिली असल्याचे निदर्शनास आणून दिले.>आयुक्तांकडे बैठकस्थायी समितीची बैठक झाल्यानंतर सभापती नवीन गवते, सभागृहनेते रवींद्र इथापे यांचीही आयुक्तांबरोबर बैठक झाली. या बैठकीमध्येही शहरातील विकासकामांविषयी चर्चा करण्यात आली. आचारसंहिता सुरू होण्यापूर्वी जास्तीत जास्त कामे मार्गी लावण्यासाठी दोन दिवसांमध्ये पुन्हा स्थायी समितीची बैठक लावण्यात येणार आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई