शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

एसीबीच्या अहवालामुळे  सिडको प्रशासन हादरले, कार्मिक विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह

By कमलाकर कांबळे | Updated: June 25, 2025 05:36 IST

कार्मिक विभागाच्या व्यवस्थापिका प्रमदा बिडवे यांच्या या प्रकरणातील सहभागावर शिक्कामोर्तब केल्याचे विश्वासनीय वृत्त आहे.  

- कमलाकर कांबळे, नवी मुंबईसिडकोमधील कथित लाचखोरी प्रकरणात नरेंद्र हिरे याला अटक झाल्यानंतर ठाणे एसीबी अर्थात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांना अहवाल सादर केला आहे. यात  कार्मिक विभागाच्या व्यवस्थापिका प्रमदा बिडवे यांच्या या प्रकरणातील सहभागावर शिक्कामोर्तब केल्याचे विश्वासनीय वृत्त आहे.  यामुळे संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा हादरली आहे.

या प्रकरणात  कार्मिक विभागाने केलेल्या बदल्या आणि नियुक्त्यांबाबत शंका उपस्थित करण्यात आल्या होत्या. यात सिडकोच्या वरिष्ठ विकास अधिकाऱ्यांना डावलून महत्त्वाच्या विभागात प्रभारी म्हणून इतर अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्याच्या तक्रारी होत्या.

भूखंड विभागातही गोंधळ

साडेबावीस टक्के भूखंड विभागातसुद्धा अशाच प्रकारे सावळागोंधळ सुरू आहे. या विभागाचा प्रभारी पदभार असलेल्या एका अधिकाऱ्याने संपूर्ण विभागाला वेठीस धरल्याचा आरोप होत आहे. विशेष म्हणजे यासंदर्भात तक्रारी करूनही दक्षता विभाग मूग गिळून गप्प असल्याचे सांगितले जात आहे. 

दक्षता विभागही कचाट्यात

कार्मिक विभागाच्या व्यवस्थापिका प्रमदा बिडवे यांच्या कारभाराविषयी यापूर्वीही अनेक तक्रारी झाल्या होत्या.  कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या बदल्या, सध्या सुरू असलेली नोकरभरती तसेच विकास अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि नियुक्ती आदींबाबत या विभागावर  गंभीर स्वरुपाचे आरोप केले गेले. 

भ्रष्टाचार रोखण्यासाठी स्थापन झालेल्या दक्षता विभागाच्या कार्यप्रणालीवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. 

अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या विरोधातील तक्रारींची नियमानुसार चौकशी करून कारवाई केली जाते. कथित  बदल्या आणि अर्थिक घोटाळ्यांबाबत चौकशी सुरू आहे. तसेच लाच प्रकरणी एसीबीचा अहवाल मंगळवारी प्राप्त झाला आहे. त्यात नमूद केलेल्या कर्मचाऱ्यांवर नियमानुसार कारवाई केली जाईल. -राजा दयानिधी, सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको

 

टॅग्स :cidcoसिडको लॉटरीAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागCorruptionभ्रष्टाचार