शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

खासगी गाड्यांवर महाराष्ट्र शासनाच्या पाटीचा गैरवापर, पोलिसांकडून कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2019 04:58 IST

कोणताही सरकारी कर्मचारी अथवा अधिकारी असला तरी त्याला आपल्या खासगी गाडीवर महाराष्ट्र शासन नावाची पाटी लावता येत नाही.

- मयूर तांबडेपनवेल- कोणताही सरकारी कर्मचारी अथवा अधिकारी असला तरी त्याला आपल्या खासगी गाडीवर महाराष्ट्र शासन नावाची पाटी लावता येत नाही. याबाबत प्रादेशिक परिवहन खात्याकडून जाहीर करण्यात आले असले, तरी पनवेल परिसरात हे नियम सर्रास पायदळी तुडवले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. सरकारी कर्मचारी आपल्या वाहनांवर महाराष्ट्र शासन नावाची पाटी लावून बिनदिक्कतपणे फिरताना दिसत आहेत.महामार्ग आणि इतरत्र होणाऱ्या पोलीस कारवायांपासून वाचण्यासाठी आणि टोलपासून सुटका होण्यासाठी वाहनांवर पोलीस, महाराष्ट्र शासन, केंद्र सरकार, पत्रकार आदी पाट्या सर्रासपणे लावल्या जातात. आरटीओच्या नियमाप्रमाणे, खासगी वाहनांवर अशा प्रकारे नाव वापर करणे हा गुन्हा आहे. मात्र, तरीही अनेक सरकारी अधिकारी खासगी वाहनांवर अशा पाट्या लावत आहेत. याबाबत पोलिसांकडून विचारणा झाली असता, संबंधित गाडीमालक पोलीस कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालतात. त्यामुळे आरटीओने या प्रकरणी विशेष मोहीम काढून कारवाई करावी, अशी मागणी सर्वसामान्यांकडून केली जात आहे. गुरुवारी प्रादेशिक परिवहन विभाग, पनवेल यांच्याकडून गाडीवर महाराष्ट्र शासन नावाची पाटी लावलेल्या वाहनावर कारवाई करण्यात आली. एमएच ०५ बीजे ३३८२ या क्र मांकांच्या वाहनावर दोन हजार रु पयांची दंडात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांनी दिली.पोलिसांनी खासगी वाहनांवर पोलीस असे लिहिण्यास कायद्याने बंदी आहे. अनेक पोलीस कर्मचारी या कायद्याचे उल्लंघन करून आपल्या गाड्यांवर पोलीस असे लिहिलेली पाटी लावतात. शिवाय विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना त्यांच्या खासगी गाड्यांवर महाराष्ट्र व केंद्र शासन असेही लिहिता येत नाही; पण त्यांच्याकडून नियमाचे उल्लंघन केले जात आहे.शासकीय कामासाठी ज्या गाड्या भाडेतत्त्वावर शासनाने घेतल्या होत्या; पण आता त्यांचा करार संपला आहे, अशा गाड्यांच्याही दर्शनी भागावर अजूनही महाराष्ट्र शासन असे लिहिलेले असल्याचे समोर आले आहे. अनेक प्रशिक्षणार्थी वकील, डॉक्टर आपल्या दुचाकीवर अ‍ॅडव्होकेट स्टीकर व सिंबॉल काढतात; पण हे कायद्यानुसार नाही. परिणामी, अशा व्यक्तींनी नियमांची पायमल्ली केली तर कारवाई होणे गरजेचे आहे.फॅन्सी नंबरप्लेट्सगाडी क्र मांकाच्या पाटीवर क्र मांकाशिवाय दुसरे काही लिहिता येत नाही; पण या नियमाचे उल्लंघन करत शहरात फॅन्सी नंबरप्लेट्सच्या अनेक गाड्या धावत आहेत. काही नेत्यांनी तर दादा, भाऊ, अशा अक्षरात गाड्यांवर क्र मांक टाकले आहेत. हे नियमाच्या विरोधात आहे. याशिवाय भारताची राजमुद्रा, सैन्यातील विविध चिन्हांची प्रतिकृतीदेखील खासगी गाडीवर लावून त्याचा गैरवापर करण्यात येतो. यावर कारवाई करण्याची गरज आहे.तोतया पत्रकारांचा कारवाईत अडथळासध्या प्रत्येक ठिकाणी तोतया पत्रकारांचा सुळसुळाट सुरू आहे. कोणत्या तरी साप्ताहिकाचा किंवा अस्तित्वात नसलेल्या वृत्तपत्राचे कार्ड तयार करायचे आणि आपल्या खासगी वाहनावर प्रेस असे बोर्ड लावून आपल्या कार्डची धमक दाखवत फिरायचे. मात्र, अशा प्रकारचे उद्योग तोतया पत्रकारांकडून मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. अशा तोतया पत्रकारांनी वाहनांवर प्रेस असे स्टीकर लावून हैदोस घातला आहे. तरी अशा तोतया पत्रकारांची सखोल चौकशी होऊन यांच्यावर कारवाई करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.महाराष्ट्र शासन, पोलीस नावाची पाटी खासगी गाडीवर कोणीही लावू शकत नाही, अशा प्रकारे पाट्या लावणाºयांवर कारवाई करत आहोत.- लक्ष्मण दराडे,प्रादेशिक परिवहनअधिकारी, पनवेल

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNavi Mumbaiनवी मुंबई