शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

कचरा व्यवस्थापनात नियोजनाचा अभाव, घंटागाडीचा मार्ग ठरेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2018 03:22 IST

शहरात घनकचऱ्याची समस्या कायम : घंटागाडीचा मार्ग अद्याप ठरलेला नाही

अरुणकुमार मेहत्रेकळंबोली : पनवेल महानगरपालिकेने कचरा उचलण्याची सेवा हाती घेतली आहे. याकरिता नवीन घंटागाड्यांसह इतर यंत्रणा कार्यान्वित केल्या जात आहेत, परंतु यात सूक्ष्म नियोजनाचा अभाव दिसून येत आहे. तसेच घंटागाड्यांचे मार्गही अद्याप निश्चित करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे घनकचरा व्यवस्थापनाच्या कामात अनेक अडचणी जाणवत आहेत.

पनवेल महापालिकेने कोणतीही तयारी नसताना कचरा व्यवस्थापनाची आव्हानात्मक सेवा हस्तांतरित करून घेतली. त्यासाठी सिडकोने गेल्या दोन वर्षांपासून तगादा लावला होता. नोड कचरामुक्त करण्यास सिडकोला यश मिळाले नाही. मात्र पुढील वर्षात आपले संपूर्ण कार्यक्षेत्र कचरामुक्त करण्याचा संकल्प महापालिकेने केला आहे. त्या अनुषंगाने दैनंदिन कचरा व्यवस्थापनासाठी साई गणेश इंटरप्रायझेस या खासगी संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे. कचरा संकलन करून वाहतूक करण्याची जबाबदारी या ठेकेदारावर सोपविण्यात आली आहे. त्याबदल्यात संबंधित ठेकेदार कंपनीला प्रत्येक टन कचºयास ७७७ रुपये अदा केले जाणार आहेत. या कामासाठी महापालिका वाहने पुरविणार आहे. त्यानुसार सध्या काही नवीन वाहने महापालिकेच्या ताफ्यात दाखल झाली आहेत. येत्या काळात आणखी वाहने येणार आहेत.

विशेष म्हणजे प्रतिकूल परिस्थितीत महापालिकेकडून कचरा व्यवस्थापनाची जबाबदारी पार पाडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यानंतरही या कामात अनेक अडचणी येताना दिसत आहेत. विशेष करून कळंबोली नोडमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा साचत आहे. कधी कधी दोन दोन दिवस कचरा उचलला जात नसल्याने नागरी आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. नियमित कचरा उचलला जात नसल्याने अनेक ठिकाणच्या सार्वजनिक कुंड्या कचºयाने भरून वाहत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहेत.नियोजन आणि मार्ग ठरवाच्या संदर्भात नगरसेवक सतीश पाटील यांनी महापालिका आयुक्तांना पत्र दिले आहे. त्यामध्ये घनकचरा व्यवस्थापन यशस्वी करायचे असेल तर याकरिता सूूक्ष्म नियोजन करण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले आहे. घंटागाडी किती वाजता कोणत्या सोसायटीसमोर जावून कचरा संकलित करेल.च्गाडी खराब झाल्यानंतर त्याला पर्याय व्यवस्था काय असेल. तसेच घंटागाडीचा मार्ग ठरविल्याशिवाय ते शक्य होणार नाही. असे झाले तर रहिवासी कचरा सार्वजनिक ठिकाणी टाकणार नाहीत. तसेच बीन्स भरून बाहेर कचरा वाहणार नाही असे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.कचरा उचलण्यासाठी नवीन घंटागाड्या महापालिकेने उपलब्ध करून दिल्या आहेत. यासाठी गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यादृष्टीने संबंधित संस्थेला सूचनाही करण्यात आल्या आहेत. लवकरच राहिलेल्या त्रुटी दूर करून कचरा व्यवस्थापनाची प्रक्रिया सुरळीत केली जाईल.-डॉ. प्रशांत रसाळ, अतिरिक्त आयुक्त महापालिका 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईGarbage Disposal Issueकचरा प्रश्न