शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
4
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
5
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
6
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
7
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
8
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
9
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
10
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
11
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
12
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
13
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
14
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
15
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
16
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
17
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
18
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
19
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
20
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

विष्णूचे दहा अवतार कोरलेली तलवार, प्रभू रामचरणी शिवप्रेमी करणार अर्पण 

By नामदेव मोरे | Updated: January 18, 2024 09:02 IST

खड्गाच्या मुठीला सोन्याचा मुलामा देण्यात आला असून, पातीवर विष्णूचे दहा अवतार कोरलेले आहेत.  श्रीराम मंदिर उभारणीमुळे देशात  राममय वातावरण झाले आहे.

नवी मुंबई : अयोध्येमधील राममंदिरासाठी देशभरातून मौल्यवान वस्तू पाठविल्या जात आहेत. शस्त्रसंग्राहक व अभ्यासक नीलेश सकट यांनी ८० किलो वजनाचे नंदन खड्ग अस्त्र तयार केले आहे. खड्गाच्या मुठीला सोन्याचा मुलामा देण्यात आला असून, पातीवर विष्णूचे दहा अवतार कोरलेले आहेत. श्रीराम मंदिर उभारणीमुळे देशात  राममय वातावरण झाले आहे.

प्रभू रामचंद्रांच्या प्रमुख शस्त्रांमध्ये नंदन खड्गाचाही समावेश होता. यामुळे महाराष्ट्रातून नंदन खड्ग मंदिरासाठी भेट देण्याचा निर्णय इतिहासाचे अबोल साक्षीदार संस्थेचे प्रमुख व शस्त्रसंग्राहक, अभ्यासक नीलेश सकट यांनी घेतला. त्यांनी यापूर्वी पालीच्या खंडोबासाठी ९८ किलो वजनाची तलवार तयार करून दिली होती. राममंदिरासाठी त्यांच्या आवडीचे नंदन खड्ग तयार केले आहे.

मूठ पूर्णपणे पितळेची    खड्गाची मूठ पूर्णपणे पितळेची असून, पाते पोलादाचे आहे. भारतीय शस्त्र परंपरेतील पटिसा प्रकारातील हे खड्ग आहे.     त्यांचे वजन ८० किलो व उंची सात फूट दाेन इंच आहे.    यावर विष्णूच्या अवताराबरोबर पद्म, शंख, गदा, चक्र ही सुचिन्ह अंकित केली आहेत.  

१८ वर्षांपासून भारतीय शस्त्रास्त्रांचा अभ्यास करत आहे. १२ वर्षांपासून महाराष्ट्र, गुजरात, गोवा, कर्नाटक राज्यांत शस्त्रप्रदर्शन  भरवून नागरिकांना शस्त्रास्त्रांची माहिती देण्याचे काम करत आहे. आतापर्यंत ७०० पेक्षा जास्त प्रदर्शने भरविली आहेत. संग्रहात दाेन हजार शस्त्रे आहेत. प्रभू रामचरणी अर्पण करण्यासाठी ८० किलो वजनाचे  नंदन खड्ग तयार केले आहे. -नीलेश सकट, शस्त्र अभ्यासक व संग्राहक

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याNavi Mumbaiनवी मुंबई