शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शिकवणीवर स्लॅब कोसळून सातवीतील विद्यार्थ्याचा मृत्यू; कोपरखैरणेतील दुर्घटना; शिक्षिकेसह १२ जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 05:37 IST

दुर्घटनाग्रस्त इमारत २८ वर्षे जुनी आहे. इमारतीच्या तळमजल्यावरील एका घरात खासगी शिकवणी सुरू असताना या तीनमजली इमारतीच्या पहिल्या मजल्याचा स्लॅब कोसळला.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : कोपरखैरणे सेक्टर २ येथील विद्याभवन को-ऑप. हाउसिंग सोसायटीच्या इमारतीचा स्लॅब कोसळून खासगी शिकवणीतील एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत अन्य ११ विद्यार्थी आणि एक शिक्षिका जखमी झाली होती. त्यांच्यावर उपचार करण्यात आले.या दुर्घटनेत मत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्याचे नाव मनीष म्हसे आहे. तो सातवीत शिकत होता. त्याच्या मृत्यूची माहिती मिळताच त्याच्या कुटुंबीयांनी आक्रोश केला. सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी त्यांनी केली आहे. तसेच मुलाचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकारही दिला आहे.  

दुर्घटनाग्रस्त इमारत २८ वर्षे जुनी आहे. इमारतीच्या तळमजल्यावरील एका घरात खासगी शिकवणी सुरू असताना या तीनमजली इमारतीच्या पहिल्या मजल्याचा स्लॅब कोसळला. त्यामुळे तळमजल्यावरील शिकवणीतील १२ विद्यार्थी आणि १ शिक्षिका ढिगाऱ्यात अडकले होते. नागरिकांनी पोलिसांसह अग्निशमन दलाला दुर्घटनेची माहिती दिली. महापालिकेचे विभाग अधिकारी भरत धांडे तसेच कोपरखैरणे आणि वाशी येथील अग्निशमन केंद्रातील बंबांनी बचावकार्याला सुरुवात केली.

महापौर, आयुक्त दुर्घटनास्थळीअपघाताचे वृत्त कळताच महापौर सुजाता पाटील, उपमहापौर दशरथ भगत आणि महापालिका आयुक्त कैलास शिंदे यांनी घटनास्थळी आणि रुग्णालयांना भेट देऊन जखमी विद्यार्थ्यांची व शिक्षिकेची विचारपूस केली.मदतकार्यात अडथळेकोसळलेल्या स्लॅबच्या ढिगाऱ्यामुळे दुर्घटनाग्रस्त घरात जाण्याचा मार्ग बंद झाला होता. परिणामी अडकलेल्यांची सुटका करण्यात अडथळे येत होते. अखेर खिडकी तोडून  ढिगाऱ्याखालील विद्यार्थ्यांची सुटका करण्यात आली. जखमींना वाशीतील पालिका रुग्णालय आणि जवळपासच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. लायन्स क्लब रुग्णालयात ३ तर एपेक्स रुग्णालयात ५ व पालिका रुग्णालयात एका विद्यार्थ्यावर उपचार सुरू असल्याचे नगरसेवक शिवराम पाटील यांनी सांगितले. ----याच इमारतीत पूर्वीही दुर्घटना विद्या भवन इमारतीमध्ये यापूर्वीही स्लॅब कोसळला होता. त्यानंतरही इमारतीचा वापर सुरू आहे, असे सामाजिक कार्यकर्ते दीपक बदक यांनी सांगितले. 

इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट केले जाणार आहे. पडझड झालेल्या घरातील रहिवाशांची पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे.डॅा. कैलास शिंदे, नवी मुंबई महापालिका

जखमी विद्यार्थी :सिद्धांत गुप्ता (वय ८) प्रिन्स सोनी (११) आयशा खान (११) कुलसुम खान (१३)निष्का धनावडे (१३)आराध्या बोरसे (१३)तन्वी श्रीवास्तव (७)देवांश पुजारी (१२)राजदीप वानखडे (१०)पार्थ खैरनार (१३)रुद्र पाटील (५)श्यामली चौधरी(५३, शिक्षिका)

English
हिंदी सारांश
Web Title : Slab Collapse Kills Student, Injures Twelve in Koparkhairane Tuition

Web Summary : A seventh-grade student died, and twelve others were injured, including a teacher, after a slab collapsed during tuition in Koparkhairane. The building was 28 years old. Rescue operations were carried out by fire brigade. Injured admitted to nearby hospitals.
टॅग्स :Building Collapseइमारत दुर्घटना