शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

समस्यांच्या विळख्याने अखेर इर्शाळवाडी संपवली

By नामदेव मोरे | Updated: July 21, 2023 11:28 IST

गावात जाण्यासाठी रस्ता नाही : विजेची सोय नाही, प्राथमिक शिक्षणाचीही बोंब

नामदेव मोरेलाेकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या इर्शाळगडाच्या कुशीत वसलेल्या इर्शाळवाडीवर दरड कोसळून घरे मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली. खालापूर तालुक्यातील मोरबे धरणाला लागून असलेल्या डोंगरावरील या गावाला वर्षानुवर्षे समस्यांचा विळखा पडला होता. गावात जाण्यासाठी रस्ता नाही. वीज नाही, सौरऊर्जेच्या अपुऱ्या प्रकाशात कसेबसे जगावे लागत आहे. प्राथमिक शिक्षणाचीही सोय नसल्यामुळे पहिलीपासून मुलांना आश्रमशाळेचा आधार घ्यावा लागतो. महत्त्वाचे पर्यटनस्थळ असूनही येथील समस्यांकडे कायम दुर्लक्ष झाले आहे. 

जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर चौकजवळ मोरबे धरणाला लागून असलेला इर्शाळगड सर्वांचे लक्ष वेधून घेतो. घाटमाथ्यावरून कोकणात येणाऱ्या व्यापारी मार्गाची टेहळणी करण्यासाठी या किल्ल्याचा उपयोग केला जात होता. गडाच्या कुशीत जवळपास ४८ कुटुंबांचे व २२८ लोकसंख्या असलेल्या इर्शाळवाडीवर दरड कोसळल्यामुळे अनेकांना प्राण गमवावे लागले. घरेदारे गेली. पनवेलपासून जवळच असलेले हे आदिवासी गाव स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही समस्यांशी झुंज देत आहे. गावात जाण्यासाठी अद्याप रस्ता नाही. ठाकूरवाडीत वाहने उभी करून पायवाटेने डोंगर चढून गावात जावे लागते. किराणापासून बांधकाम साहित्यही दोन तास डोंगर चढून वर घेऊन जावे लागते. गावात जाण्यासाठी पक्का रस्ता असावा, अशी मागणी ग्रामस्थांनी वर्षानुवर्षे केली; परंतु, त्याकडे फारसे कोणी लक्ष दिले नाही. 

एखादी व्यक्ती आजारी पडली, तर त्यांना डोलीत बसवून खाली आणावे लागायचे. गावात वीजपुरवठाही नव्हता. ग्रामपंचायतीने सौरऊर्जेच्या माध्यमातून वीज देण्याचा प्रयत्न केला; परंतु, सौरदिव्याचा प्रकाश पुरेसा नव्हता. पावसाळ्यात सौरदिवे बंद राहायचे. सौरदिव्यांच्या बॅटऱ्याही अनेक वेळा नादुरुस्त व्हायच्या.  रस्ता, वीज नसल्यामुळे गावात आरोग्य व इतर सुविधाही मिळत नव्हत्या. 

‘लोकमत’चा पाठपुरावाइर्शाळवाडीतील समस्यांवर ‘लोकमत’ने वेळोवेळी आवाज उठविला होता. गावात रस्ता, वीज, शिक्षण, आरोग्य सुविधा मिळाव्या, यासाठी वेळोवेळी तेथील प्रश्न मांडले. गैरसोयींवरही प्रकाश टाकला होता.

ऐतिहासिक महत्त्वसरनोबत नेताजी पालकर यांचे जन्मगाव असलेल्या चौक गावाच्या समोरच इर्शाळगड उभा आहे.  विर्वाच्या आकाराचा गडाचा कडा मुंबई-पुणे महामार्गावर जाताना लक्ष वेधून घ्यायचा. व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याचा उपयोग केला जात होता. गडावर बांधकामे नाहीत. पण गडाचा सुळका राज्यभरातील पर्यटकांना आकर्षित करतो. गडावरून प्रबळगड, माणिकगड, कर्नाळा, माथेरान असा परिसर दिसत असल्यामुळे पर्यटक वर्षभर इर्शाळगड पाहण्यासाठी यायचे. गडावरून मोरबे धरणाचा परिसरही पाहावयास मिळतो.

टॅग्स :Raigad Irshalwadi Landslide Incidentरायगड इर्शाळवाडी दुर्घटना प्रकरणRainपाऊस