शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

कंपनीत आग; स्फोटानंतर केमिकलने नालाही पेटला; पावणेतील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2024 13:03 IST

आगीची माहिती मिळताच एमआयडीसी तसेच महापालिकेच्या अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले होते.

नवी मुंबई : पावणे एमआयडीसीमधील मेहक या कंपनीत आग लागल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. कंपनीत काम सुरू असताना ही दुर्घटना घडली असून आगीचे नेमके कारण स्पष्ट झाले नाही तर आगीमुळे ड्रमचे स्फोट होऊन त्यामधील केमिकल रस्त्याने वाहत नाल्यात गेले असता तेदेखील पेटल्याने नाल्यातही आग पसरली होती. यामध्ये एका कंपनीचे नुकसान झाले आहे.

आगीची माहिती मिळताच एमआयडीसी तसेच महापालिकेच्या अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले होते. अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या या कंपनीचा प्रकल्प सलग तीन भूखंडावर पसरलेला आहे. तर कंपनीला लागूनच इतरही काही रासायनिक कंपन्या आहेत. त्यामुळे परिसराला आगीचा धोका निर्माण झाला होता.

कामगारांना सुरक्षित ठिकाणी हलविले-  तुर्भे एमआयडीसी पोलिसांनीही त्याठिकाणी धाव घेऊन परिसरातील कंपन्यांमधील कामगारांना सुरक्षित ठिकाणी हलवले. अखेर फोमचा मारा करून अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवावे लागले. त्यामध्ये सुमारे पाच तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. यामध्ये कोणालाही गंभीर दुखापत झाली नसून आगीच्या कारणाचा तपास सुरू असल्याचे एमआयडीसी अग्निशमन केंद्र अधिकारी संतोष पाटील यांनी सांगितले.

- आगीमध्ये उडणारा भडका व रस्त्यावरून नाल्यात वाहणारे केमिकलचे पाट यांनी देखील पेट घेतला होता. त्यामुळे नाल्यातल्या झाडांनीदेखील पेट घेऊन धुराचे लोट निघत होते. 

टॅग्स :fireआग