शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
4
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
5
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
6
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
7
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
8
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
9
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
10
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
11
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
12
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
13
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
14
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
15
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
16
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
17
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
18
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
19
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
20
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...

अनधिकृत बांधकामप्रकरणी वर्षभरात १५१ जणांवर गुन्हे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2020 01:26 IST

पालिकेच्या परवानगी विनाबांधकाम केल्याप्रकरणी गतवर्षात १५१ जणांविरोधात एमआरटीपी अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

नवी मुंबई : पालिकेच्या परवानगी विनाबांधकाम केल्याप्रकरणी गतवर्षात १५१ जणांविरोधात एमआरटीपी अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामध्ये रबाळे पोलीसठाण्यात सर्वाधिक ८० गुन्हे दाखल आहेत. मात्र, शहरात अद्यापही शेकडोच्या संख्येने अतिक्रमणे सुरू असतानाही त्यावर कारवाईकडे होत असलेल्या दुर्लक्षावरून कारवाईच्या पारदर्शकतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.शहरातील वाढती अनधिकृत बांधकामे नागरी सुविधांवर परिणामकारक ठरत आहेत. त्यामुळे दिघा येथील प्रकरणानंतर अनधिकृत बांधकांवर काही प्रमाणात प्रशासनाकडून कारवाईला गती देण्यात आली आहे. त्यानुसार नवी मुंबई महापालिका क्षेत्रात सन २०१९ मध्ये महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम (एमआरटीपी) अंतर्गत १५१ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यापैकी सर्वाधिक ८० गुन्हे रबाळे पोलीसठाणे अंतर्गतचे असून वाशी, तुर्भे व रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकाही गुन्ह्याची नोंद नाही. तर सानपाडा व सीबीडी पोलीस ठाण्यात प्रत्येकी एका गुन्ह्याची नोंद आहे; परंतु शहरात प्रत्यक्षातील अतिक्रमणे व दाखल गुन्हे यात प्रचंड तफावत असल्याची खंत सर्वसामान्यांकडून व्यक्त होत आहे.अवैध बांधकामांना पूर्णपणे आळा घालण्यासाठी विनापरवाना बांधकाम सुरू असतानाच संबंधितावर गुन्हे दाखल करून बांधकाम पाडले जाणे आवश्यक आहे. यानंतरही अनेकदा बांधकाम पूर्ण होईपर्यंत स्थानिक पातळीवरील अधिकाऱ्यांकडून त्याकडे दुर्लक्ष केले जाते. तर बांधकाम पूर्ण झाल्यानंतर त्याचा रहिवासी वापर सुरू करून त्यावरील कारवाई टाळण्यासाठी न्यायालयात धाव घेण्याची संधीही दिली जात असल्याचा आरोप होत आहे. तर बहुतांश ठिकाणी बांधकाम पाडल्यानंतरही त्या ठिकाणी इमारती उभ्या असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामागे अर्थपूर्ण हितसंबंधांसह राजकीय वरदहस्त वापरला जात असल्याचाही आरोप होत आहे. अशा अनधिकृत बांधकामांचा परिणाम तिथल्या मूलभूत सुविधांवर उमटून स्थानिकांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.अनेक ठिकाणी उद्यानाच्या भिंतीवरच घरांच्या भिंती उभारण्यात आल्या आहेत. तर रेल्वे रुळालगतच्या मोकळ्या जागा, सिडकोचे भूखंड हडपून त्या ठिकाणी इमारतींसह चायनिस सेंटर उभारण्यात आले आहेत. काही इमारतींच्या तळमजल्याची जागा बंदिस्त करून त्या ठिकाणी बार व हॉटेल चालवले जात आहेत. घणसोली, कोपरखैरणे, वाशी तसेच सानपाडा परिसरात अशी बांधकामे पाहायला मिळत आहेत. त्यामुळे एकापेक्षा अधिक वेळा कारवाई करूनही जी बांधकामे सातत्याने उभारली जात आहेत, त्यांच्यावर मोक्काअंतर्गत कारवाई करून त्यामध्ये संबंधित अधिकाऱ्यांचाही समावेश करण्याचीही मागणी होत आहे.>एमआरटीपी अंतर्गत दाखल गुन्ह्यांची संख्यापोलीस ठाणे गुन्हेरबाळे ८०कोपरखैरणे ५५एनआरआय ०८नेरुळ ०४एपीएमसी ०२सानपाडा ०१सीबीडी ०१रबाळे एमआयडीसी ००तुर्भे ००वाशी ००एकूण १५१