योगेश पिंगळे ।लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : महापालिकेच्या स्थापनेपासून शहर विकासासाठी योगदान देणारे अधिकारी व कर्मचारी निवृत्त होऊ लागले आहेत. पुढील दहा वर्षांत तब्बल ७९१ अधिकारी व कर्मचारी निवृत्त होणार आहेत. यामुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण वाढणार आहे. कर्मचारी भरती प्रक्रिया धिम्या गतीने सुरू असून, त्यामध्ये सुधारणा झाली नाही तर भविष्यात त्याचा परिणाम शहराच्या विकासावर होण्याची शक्यता आहे.
नवी मुंबई महापालिकेच्या स्थापनेनंतर ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत असणारे कर्मचारीही पालिकेमध्ये सामावून घेण्यात आले. सिडको व इतर ठिकाणी कार्यरत असणारे अधिकारी व कर्मचारीही तेथील नोकरी सोडून महापालिकेमध्ये सहभागी झाले. महापालिका स्थापन होऊन २७ वर्षे पूर्ण झाली असून, पालिकेच्या स्थापनेपासून महापालिकेच्या विविध विभागांचे कामकाज पाहणाºया कर्मचाऱ्यांची सेवा संपुष्टात येत आहे. राज्यातील सर्व महापालिकांमध्ये प्रशासकीय खर्च कमी असलेल्या नवी मुंबई महापालिकेत आस्थापनेवर जवळपास २५०० इतकेच मनुष्यबळ आहे. पालिकेत आस्थापनेव्यतिरिक्त कंत्राटी आणि ठोक मानधन करार पद्धतीने कर्मचाºयांची भरती करून कामे करून घेतली जात आहेत. भरती प्रक्रि या होत नसल्याने करार आणि कंत्राटी पद्धतीने काम करणाºया कर्मचाºयांचे भवितव्यही अंधारमय झाले आहे. येत्या दहा वर्षांत आस्थापनेवरील सर्वच संवर्गातील सुमारे ७९१ हून अधिक कर्मचारी निवृत्त होणार आहेत.
या कर्मचाºयांच्या रिक्त होणाºया जागांच्या अनुषंगाने नवीन भरती केली जात नसल्याने त्याचा परिणाम पालिकेच्या कामकाजावरही होणार आहे. महापालिकेच्या आरोग्य आणि अग्निशमन विभागात भरती प्रक्रि या सुरू करण्यात आली आहे; परंतु इतर विभागांकडे दुर्लक्ष झाले आहे. निवृत्त होणाºया कर्मचाºयांच्या तुलनेमध्ये नवीन पदांची भरती झाली नाही तर त्याचा फटका भविष्यात बसणार आहे. यामुळे शहरातील विकासकामांचे प्रस्ताव तयार करण्याबरोबर आस्थापनेवर पुरेसे अधिकारी व कर्मचारी उपलब्ध होतील याकडेही लक्ष देणे महत्त्वाचे आहे.अनेक वर्षांपासून बदल्या नाहीतच्महापालिकेच्या अनेक विभागातील कर्मचारी गेल्या अनेक वर्षांपासून त्याच पदावर आणि त्याच जागेवर काम करीत असून त्यांच्या बदल्या तसेच पदोन्नतीही करण्यात आलेली नाही.च्महापालिकेच्या रु ग्णालयात सुमारे १५० हून अधिक परिचारिका गेल्या १७ ते २५ वर्षांपासून एकाच ठिकाणी काम करीत आहेत. अनेक वर्षांपासून एकाच ठिकाणी काम करणारे कर्मचारी बदली करण्याची मागणी प्रशासनाकडे करीत आहेत. एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेल्यांची नियमांप्रमाणे बदली करण्याची मागणी होत आहे.आरोग्य विभाग आणि अग्निशमन विभागाची भरती प्रक्रिया सुरू आहे. आपल्याकडे परीक्षा मंडळ नाही त्यामुळे वर्षभर परीक्षा नाही घेऊ शकत. सर्व विभागासाठी भरती प्रक्रिया होणार असून, २१ आॅगस्ट २०१७ साली ६५६ अतिरिक्त पदे मंजूर झाली आहेत. ही सर्व पदे येत्या दोन वर्षात भरली जाणार आहेत. आपले सेवा प्रवेश नियम अंतिम आहेत त्यामुळे दोन विभागाची भरती प्रक्रि या सुरू आहे. मराठा आरक्षणाचे नियम सतत बदलत असल्याने प्रक्रिया थांबत होती; परंतु आता तशी काही अडचण येणार नाही, येत्या दोन वर्षात सर्व पदे भरली जातील.- किरणराज यादव, उपायुक्त,प्रशासन न.मुं.म.पा.निवृत्त कर्मचाºयांचा सन्मानच्महापालिकेमधील काही अधिकारी २०१६ मध्ये निवृत्त झाले काहींनी स्वेच्छा निवृत्ती घेतली. या कर्मचाºयांचा निरोप सभारंभही करण्यात आला नव्हता, यामुळे महानगरपालिकेमधील कर्मचाºयांनी व लोकप्रतिनिधींनी नाराजी व्यक्त केली होती; परंतु आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी निवृत्त कर्मचाºयांचा सन्मान करण्यास सुरुवात केली आहे. मुख्यालयात निवृत्त कर्मचाºयांना निरोप देण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन केले जात असून, महापौर व आयुक्त स्वत: या कर्मचाºयांचा सन्मान करत असल्यामुळे समाधान व्यक्त केले जात आहे. शहराच्या विकासात योगदान देणाºया अधिकारी व कर्मचारी निवृत्त होताना सन्मान करण्याची प्रथा सुरू ठेवावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.महापालिकेच्या विकासात योगदान१ग्रामपंचायतीमधून थेट महापालिका झालेली नवी मुंबई देशातील एकमेव महापालिका. १९९२ मध्ये स्थापन झालेल्या महापालिकेने १९९५ मध्ये ७९ कोटी ३४ लाख रुपयांचा पहिला अर्थसंकल्प सादर केला होता.२वर्षाखेरीस फक्त १८ कोटी ५८ लाख रुपये उत्पन्न मिळविण्यात यश आले होते. महापालिकेमधील अधिकारी व कर्मचाºयांनी केलेल्या मेहनतीमुळे २०१९ मध्ये ४०२० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यापर्यंत मजल मारली आहे.३गतवर्षी तब्बल २०६४ कोटी रुपये कर वसूल करण्यात यश आले होते. महापालिकेला डबल ए प्लस पतमानांकन प्राप्त झाले असून तीन हजार कोटींपेक्षा जास्त ठेवी ठेवण्यातही यश आले असून, यामध्ये अधिकारी व कर्मचाºयांच्या मेहनतीचाही वाटा आहे.