शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
2
राजीनामा-शासन भिकारी, माणिकराव कोकाटेंच्या विधानावर CM फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले...
3
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
4
“माणिकराव कोकाटेंची हकालपट्टी करण्याची हिंमत CM फडणवीस यांच्यात नाही का?”: हर्षवर्धन सपकाळ
5
Video : चाकू काढला आणि ३२ हजारांचा लेहेंगा फाडला, दुकानदाराला म्हणाला, 'तुलाही असाच फाडेन'; कल्याणमधील व्हिडीओ व्हायरल
6
Post Office मध्ये जमा करा १ लाख, मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स व्याज; चेक करा डिटेल्स
7
प्राजक्ता माळीसोबत फोटो हवा म्हणून त्याने लिफ्टच थांबवली, पुढे काय घडलं? Video व्हायरल
8
कसोटीत सर्वाधिक मेडन ओव्हर्स टाकणारे टॉप ५ भारतीय गोलंदाज!
9
उज्ज्वल निकम आता यापुढे संतोष देशमुख प्रकरणाची केस लढणार नाहीत? पण कारण काय? चर्चांना उधाण
10
अदानी-महिंद्रासह दिग्गज स्टॉक्स गडगडले! सेन्सेक्स-निफ्टी सपाट; मात्र 'या' शेअरने केली कमाल!
11
'गाढवाचं लग्न'मधील सावळ्या कुंभाराच्या खऱ्या गंगीला पाहिलंत का?, एकेकाळी होती प्रसिद्ध अभिनेत्री
12
कोंढव्यातील ‘त्या’ तरुणीवर गुन्हा दाखल; खोटी माहिती, पुरावे तयार करून पोलिसांची केली दिशाभूल
13
₹१५ वरुन ₹४५५ वर ट्रेड करतोय 'हा' शेअर; जोरदार तेजी, आता मोठा Whiskey ब्रँड खरेदी करण्याची तयारी
14
IND vs ENG: शुभमन गिल की सचिन तेंडुलकर? ३५ कसोटीनंतर कोण वरचढ? पाहा आकडे!
15
६२ वर्षांच्या सेवेनंतर मिग-२१ लढाऊ विमान निरोप घेणार; १९६५ च्या युद्धात पाकिस्तानला टक्कर दिलेली
16
स्वतःचं घर बांधण्याचं स्वप्न पाहताय? 'सेल्फ-कन्स्ट्रक्शन होम लोन' कसं मिळवायचं, व्याजासह प्रक्रिया जाणून घ्या
17
Deep Amavasya 2025: आषाढ अमावास्येला दिव्यांची आवस म्हणतात, गटारी नाही; धर्मशास्त्र सांगते...
18
ट्रेन सुटली तरीही वाया जात नाही तुमचं तिकीट...! रेल्वेचा हा नियम तुम्हाला कदाचितच माहित असेल
19
शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांना पोलिसांनी घेतले ताब्यात, मुक्ताईनगर बंद
20
Viral Video: महाकाय अजगराला जांभई देताना कधी पाहिलंय का? दृश्य पाहून तुम्हालाही भरेल धडकी...

पनवेल ग्रामपंचायतींत 78.52 टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 00:48 IST

१८६ जागांसाठी ३९० उमेदवार रिंगणात : केंद्रावर आशासेविकांची नियुक्ती, ५५,२९७ मतदारांनी बजावला हक्क

लोकमत न्यूज नेटवर्क पनवेल : पनवेल तालुक्यातील २२ ग्रामपंचायतींसाठीचे मतदान शुक्रवारी १५ जानेवारी रोजी पार पडले. २२ ग्रामपंचायतींच्या १८६ जागांसाठी ३९० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले.. तालुक्यात शांततेत मतदानाची प्रक्रिया पार पडली. पनवेलमध्ये ७८.५२ टक्के मतदानाची नोंद झाली.            पनवेलमधील २४ ग्रामपंचायतींपैकी आकुर्ली व खानावले या दोन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने २२ ग्रामपंचायतींसाठी या निवडणुका पार पडल्या. ५५,२९७ मतदारांचा समावेश होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून मतदान केंद्रावर आशा वर्करची नियुक्ती करण्यात आली होती. मतदानाचा हक्क बजावणाऱ्या मतदारांना यावेळी थर्मल स्कॅनिंग तसेच सॅनिटायझर वापरूनच केंद्रात प्रवेश देण्यात आला. 

२२ ग्रामपंचायतींच्या मतदान केंद्रावर पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला. ९४ मतदान केंद्रांवर एकूण ५६४ कर्मचारी कार्यरत होते. प्रथमच पनवेल तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका शांततेत पार पडल्या. कोणत्याही ठिकाणी अनुचित प्रकार घडला नाही. परिमंडळ दोन कार्यक्षेत्रात एकूण ७५० पोलिसांचा फौजफाटा पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी ठेवला होता. मतदारांमध्ये यावेळी मोठा उत्साह पाहायला मिळाला. तरुणांसह जेष्ठ नागरिक देखील मतदानाला मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडले होते. १८६ जागांसाठी ३९० जणांचे भवितव्य मतदान पेटीत कैद झाले आहे. १८ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. तेव्हा २२ ग्रामपंचायतींमधील चित्र स्पष्ट होणार आहे.

या २२ ग्रामपंचायतींसाठी मतदानकेवाळे, वलप , कोळखे , वाकडी, वारदोली, उमरोली, हरिग्राम, उसर्ली खुर्द , वाजे, बारवई, सांगुर्ली, मोर्बे, देवळोली, आपटा, खैरवाडी, खाणाव, नानोशी, पालेबुद्रुक, सावळे, साई, पोसरी, पालीदेवद.

ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाडमतदानावेळी चार केंद्रांवर ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. पाली देवद, वाजे आणि वारदोली या मतदान केंद्रांसह सांगुर्ली मतदान केंद्रावर देखील अशीच समस्या उद्भवली होती. यावेळी तत्काळ ईव्हीएम तांत्रिक बिघाड दूर करण्यात आला.

संपूर्ण तालुक्यात शांततेत मतदान पार पडले. कोणत्याही ठिकाणी अनुचित प्रकार घडला नाही. चार ठिकाणी ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. तो त्वरित दुरुस्त करण्यात आला.-विजय तळेकर, तहसीलदार /निवडणूक निर्णय अधिकारी, पनवेल 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईpanvelपनवेल