शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

७५,००० ट्रेलर्सचा ‘जेएनपीए’त ठिय्या, बंदरातील आयात-निर्यात ठप्प 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2024 14:50 IST

वाहनचालकांच्या आंदोलनामुळे रेती, माती आणि इतर वाहतूक बंद असल्याने बांधकाम व्यवसायही अडचणीत आला...

उरण : वाहनचालकांच्या आंदोलनामुळे मंगळवारी ‘जेएनपीए’ परिसरात ठिकठिकाणी ७५ हजारांहून अधिक वाहने विविध रस्त्यांवर उभी आहेत. सध्या या बंदरातील ६० टक्के मालवाहतूक ठप्प झाली आहे. सोमवारपासून बंदर आणि परिसरातील १२५ कंटेनर यार्डाद्वारे होणाऱ्या मालाची आयात-निर्यात कोलमडल्याने शेकडो कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. बंदरांवर आधारित १२५ सीएसएफ आणि कंटेनर यार्डातील कामकाज ठप्प झाले आहे. यामुळे द्रोणगिरी नोड, पंजाब कॉन्वेअर, आयओटीएल आदी परिसरात ७० हजार कंटेनर ट्रेलर्स उभे असल्याची माहिती उरण वाहतूक नियंत्रण शाखेचे उपनिरीक्षक संजय पवार यांनी दिली. विविध रस्त्याच्या कडेला दुतर्फा ट्रेलर्स उभे केले आहेत. जेएनपीए परिसरातील विविध रस्त्यांवर दोन हजारांहून अधिक कंटेनर उभे असल्याचे न्हावा-शेवा बंदर वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जी. एम. मुजावर यांनी सांगितले.

रेती-खडी वाहतूक बंदवाहनचालकांच्या आंदोलनामुळे रेती, माती आणि इतर वाहतूक बंद असल्याने बांधकाम व्यवसायही अडचणीत आला आहे.चर्चा करून मार्ग काढाबंदरात मालवाहतूक करणाऱ्या वाहतूकदार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून मार्ग काढण्याची सूचना केल्याची माहिती न्हावा-शेवा बंदर विभागाचे सहायक पोलिस आयुक्त धनाजी क्षीरसागर यांनी दिली.

नियंत्रण कक्ष स्थापन करा, मुख्यालय सोडू नका मुंबई : वाहतूकदारांच्या बंदमुळे नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन करा, मुख्यालय सोडू नका, असे आदेश अपर परिवहन आयुक्त जितेंद्र पाटील यांनी प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि उप प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना दिले. 

टॅग्स :agitationआंदोलनNavi Mumbaiनवी मुंबई