शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

75% पोलिसांनी घेतला डोस, नवी मुंबईत कोरोनाचा संसर्ग वाढला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2021 09:20 IST

गेल्यावर्षी मार्च महिन्यात नवी मुंबईत कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर काही दिवसांतच शहरात कोरोना रुग्णांची संख्या दोन आकड्यांवर पोहोचली होती.

सूर्यकांत वाघमारे - 

नवी मुंबई : नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील ७५ टक्के पोलिसांनी कोरोनाचा पहिला डोस घेतला आहे, तर १२ टक्क्यांच्या जवळपास पोलिसांनी दुसरा डोस घेतला असून, पुढील काही दिवसांत १०० टक्के पोलिसांचा पहिला डोस पूर्ण होणार आहे. शहरात पुन्हा एकदा कोरोना वाढू लागल्याने पोलिसांमध्येही चिंता वाढू लागली आहे. गेल्यावर्षी मार्च महिन्यात नवी मुंबईत कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर काही दिवसांतच शहरात कोरोना रुग्णांची संख्या दोन आकड्यांवर पोहोचली होती. यादरम्यान लॉकडाऊन लागला असता नवी मुंबईसह पनवेल व उरणची परिस्थिती हाताळताना अनेक पोलीस कोरोनाबाधित झाले होते. त्यात दहाजणांचे प्राण गेले, तर एक हजाराहून अधिकांना कोरोनाचा संसर्ग होऊन त्यातून ते बरे झाले. मागील दोन महिने शहरातील कोरोना रुग्णांची संख्या घटत चालली असता, पुन्हा एकदा कोरोना रुग्णांचा प्रतिदिनचा आकडा १०० च्या वर पोहोचला आहे. त्यामुळे पोलिसांमध्ये देखील चिंता वाढू लागली आहे. त्यामुळे सर्व पोलिसांचे लसीकरण पूर्ण व्हावे यासाठी वरिष्ठांचे प्रयत्न सुरू आहेत. 

७५.४८ टक्के पोलिसांनी घेतली लस - कोरोनावर लस आल्यानंतर प्राधान्याने ती पोलिसांनाही दिली जात आहे. त्यानुसार नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील एकूण चार हजार ७२७ पैकी तीन हजार ५६८ पोलिसांनी पहिली लस घेतली आहे. त्यापैकी कोणालाही कोणताही त्रास झाला नाही. उर्वरित एक हजार १५९ पोलिसांना देखील येत्या काही दिवसांत दिली जाणार आहे. यामुळे कर्तव्य बजावताना एकमेकांच्या संपर्कातून कोरोनाच्या संसर्गाचा धोका टळणार आहे.   - मागील वर्षी लॉकडाऊन दरम्यान बंदोबस्तावर असताना बहुतांश पोलिसांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यापासून कुटुंबीयांना देखील संसर्ग झाल्याने पोलीस दलाच्या मनुष्यबळावर मोठा परिणाम झाला होता. यावेळी खबरदारी म्हणून आयुक्तालयामार्फत पोलिसांकरिता अनेक उपाय योजना राबविण्यात आल्या होत्या. अशीच परिस्थिती पुन्हा उद्भवू नये याकरिता पोलिसांना लस देण्यास प्राधान्य दिले जात आहे.  

१२.८६ टक्के पोलिसांना दुसरा डोस पहिला डोस घेतल्यानंतर २८ दिवसांचा कालावधी पूर्ण करून दुसरा डोस घेण्यासदेखील पोलिसांकडून प्राधान्य दिले जात आहे. त्यानुसार ६०८ जणांनी दुसरा डोस पूर्ण केला आहे, तर लवकरच सर्वच पोलिसांचा पहिला डोस पूर्ण होईल असे मुख्यालय पोलीस उपायुक्त अभिजित शिवथरे यांनी सांगितले. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिसNavi Mumbaiनवी मुंबई