शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

७०० किमी पीठ, मीठ, गॅस दुचाकीला बांधून आणला; घरूनच आणले सर्व अत्यावश्यक साहित्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2024 08:09 IST

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मसाला मार्केटमध्ये धनाजी जाधव पाटील दुपारी दोन वाजता दाखल झाला.

नवी मुंबई : मराठा आरक्षणाच्या दिंडीमध्ये नांदेडमधील धनाजी जाधव  हा तरुण शेतकरीही सहभागी झाला आहे. मोटारसायकलवर ७०० किलोमीटर प्रवास करून नवी मुंबईत दाखल झाला. मोटारसायकलवर गॅस, चटणी, मीठ, पीठ व जेवण बनविण्याचे सर्व  साहित्य घरून घेऊनच आला आहे. 

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मसाला मार्केटमध्ये धनाजी जाधव पाटील दुपारी दोन वाजता दाखल झाला. मोटारसायकलवर लावलेला ‘आरक्षणाचे तोरण बांधले, नाही कुणाची भीती, लाख संकटे झेलून जाती अशी मराठी ख्याती’, असा फलक सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. चलो मुंबई, झाडे लावा झाडे जगवा, स्वच्छता राखा असे फलकही मोटारसायकलवर लावण्यात आले होते. मोटारसायकलच्या मागील बाजूला जेवण चटई, बिछाना, गॅस, चटणी, मीठ, पीठ, डाळी, कांदा, लसूण असे स्वयंपाक बनविण्यासाठीचे सर्व साहित्य ठेवले आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी सर्व तयारीनिशी निघा अशा सूचना दिल्यामुळे ही सर्व तयारी केली असल्याचे त्याने सांगितले. नांदेडमधील कंधार तालुक्यातील मोहिजा पटांडा गावातील शेतकरी असलेला धनाजी जाधव पाटील याने आवश्यकता भासल्यास स्वत:च स्वयंपाक बनविण्याची तयारी केली होती. आवश्यक ते सर्व साहित्य बरोबर घेतले. आतापर्यंत प्रवासात मराठा बांधवांनी सर्व ठिकाणी योग्य पाहुणचार केल्याने प्रत्यक्षात स्वयंपाक बनविण्याची वेळ आली नाही, असे धनाजी जाधव यांनी सांगितले.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षण