तलासरीत बुधवारी ७ दिवसाच्या गणरायाचे गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या च्या गजरात उत्साहात विसर्जन करण्यात आले. तलासरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत ७ दिवसाचे १२ तर १ सार्वजनिक गणपती बसविण्यात आले होते. त्यांचे विसर्जन झाले. तलासरीतील कुर्झे धरण, झरि खाडी नदी, कवाडा नदी या ठिकाणी विसर्जन करण्यात आले. यावेळी तलासरी पोलीसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता विसर्जन शांततेत पार पडावे यासाठी मंडळाचे कार्यकर्तेही दक्ष होते.
७ दिवसाच्या गणरायांचे विसर्जन...
By admin | Updated: September 23, 2015 23:55 IST