शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

उलवेत बनावट रॉयल्टी चलनप्रकरणी सात जणांविरोधात गुन्हा दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2020 10:14 IST

कलेक्टर विभागाच्या चौकशीत बनावट चलन हाती लागल्याने हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी अद्याप कोणाला अटक करण्यात आलेली नसून पोलीस अधिक तपास करत आहेत. 

नवी मुंबई - बनावट चलन बनवून 5 लाखाची रॉयल्टी चुकवल्याप्रकरणी एनआरआय पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलेक्टर विभागाच्या चौकशीत बनावट चलन हाती लागल्याने हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी अद्याप कोणाला अटक करण्यात आलेली नसून पोलीस अधिक तपास करत आहेत. 

उलवे येथील खदाणीतून रॉयल्टी चुकवून खडी विक्री होत असल्याची माहिती कलेक्टर विभागाला मिळाली होती. त्यानुसार काही अधिकाऱ्यांनी खडी वाहतूक करणाऱ्यांकडे रॉयल्टी भरल्याच्या चलनाबद्दल विचारणा केली होती. यावेळी एका व्यक्तीने जमा केलेले चलन बनावट असल्याचे समोर आले. त्यानुसार उलवेमधील एका घराची झडती घेतली असता त्या ठिकाणी जे. एम. म्हात्रे इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या नावे बनावट चलन पुस्तिका बनवल्याचे आढळून आले. प्रत्यक्षात त्यांचा या प्रकरणाशी संबंध नसल्याचे पोलिसांनी सांगितले. शिवाय शासनाचा रबर स्टॅम्प देखील आढळून आला.याबाबत ओमप्रकाश उपाध्याय या व्यक्तीकडे चौकशी केली असता सहा व्यक्तींच्या सांगण्यावरून त्याने बनावट चलन व स्टॅम्प बनवल्याचे सांगितले. या चलनाद्वारे त्यांनी रेती व खडीची विक्री करून शासनाची सुमारे 5 लाखांची रॉयल्टी बुडवल्याचे उघड झाले. त्यानुसार घडलेल्या प्रकाराविरोधात एनआरआय पोलिसांकडे तक्रार करण्यात आली आहे. त्यानुसार सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तन्वीर शेख यांनी सांगितले. तर यामध्ये इतरही कोणाचा सहभाग आहे का याचाही तपास पोलीस करत आहेत.