शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

सिडकोच्या शिल्लक घरांसाठी ६0 हजार अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2019 23:56 IST

१४ फेब्रुवारी रोजी संगणकीय सोडत

नवी मुंबई : सिडकोच्या शिल्लक ११00 घरांसाठी तब्बल ६0 हजार अर्ज प्राप्त झाले आहे. विशेष म्हणजे त्यापैकी ४२ हजार ग्राहकांनी अनामत रक्कम भरून अर्जाची प्रक्रिया पूर्ण केली आहे. अर्ज भरण्याची उद्याची अंतिम मुदत असल्याने अखेरच्या दिवसांत अर्जाच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता सिडकोच्या संबंधित विभागाने व्यक्त केली आहे.सिडकोने आॅगस्ट २0१८ मध्ये पंधरा हजार घरांचा योजना जाहीर केली होती. आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न घटकांसाठी असलेल्या या मेगागृहप्रकल्पातील घरांसाठी राज्यभरातून सुमारे दोन लाख अर्जदारांनी अर्ज भरले होते. यातील पात्र अर्जदारांची आॅक्टोबर महिन्यात संगणकीय सोडत काढण्यात आली. परंतु काही विभागातील घरांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे या गृहप्रकल्पातील ११00 घरांची विक्री झालेली नाही. या शिल्लक घरांसाठी सिडकोने १ जानेवारीपासून नव्याने अर्ज मागविले होते. मागील तीस दिवसांत या शिल्लक घरांसाठी तब्बल ६0,000 अर्ज प्राप्त झाले आहेत. अर्ज भरण्याचा उद्याचा अखेरचा दिवस आहे. दरम्यान, प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी करून पात्र अर्जाची १४ फेब्रुवारी रोजी संगणकीय सोडत काढली जाणार असल्याचे सिडकोकडून स्पष्ट करण्यात आले आहे.शिल्लक घरांचा तपशीलतळोजा, खारघर, कळंबोली, घणसोली आणि द्रोणागिरी या पाच नोडमध्ये १४,८३८ घरांचा मेगागृहप्रकल्प उभारला जात आहे. संगणकीय सोडतीनंतर त्यातील ११00 घरे शिल्लक आहेत. यापैकी सर्वाधिक घरे द्रोणागिरी आणि तळोजा नोडमध्ये आहेत. यातील बहुतांशी घरे खुले गटासाठी आरक्षित असून पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत या घरांचे निर्माण कार्य केले जात आहे.

टॅग्स :cidcoसिडको