- नामदेव मोरेलोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : ग्रामपंचायतीमधून महापालिकेत रूपांतर झालेली नवी मुंबई देशातील एकमेव महापालिका. स्थायी समिती ही महापालिकेची तिजाेरी समजली जाते. या तिजोरीची चावी सभापती म्हणून २० जणांनी सांभाळली. दोघांनी हॅटट्रिक केली असून दोन महिलांनाही संधी देण्यात आली आहे. तीन दशकामध्ये पालिकेने तब्बल ५५ हजार ८०३ कोटी रुपयांची गंगाजळी प्राप्त केली आहे. यातून हजारो कोटींची विकासकामे केली असून यामध्ये स्थायी समितीचा महत्त्वाचा वाटा आहे.
देशातील श्रीमंत महापालिकेत नवी मुंबईचाही समावेश होतो. शासनाने दिघा ते बेलापूरपर्यंतच्या सर्व ग्रामपंचायती विसर्जित करून १९९२ मध्ये या महापालिकेची स्थापना केली.
पहिले सभापती बिराजदार १९९५ मध्ये महापालिकेची पहिली निवडणूक झाली व पहिले स्थायी समिती सभापती म्हणून शशिकांत बिराजदार यांची नियुक्ती करण्यात आली. पहिलाच अर्थसंकल्प ७९ कोटी ३४ लाख रुपयांचा तयार केला होता. परंतु, वर्षभरात १८ कोटी ५८ लाख रुपये महसूल मिळविता आला. तेव्हापासून प्रत्येक वर्षी टप्प्याटप्प्याने महापालिकेच्या महसुलात वाढ होत गेली व अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प महानगरपालिकेने प्रत्यक्षात साकार केले. तीन दशकामध्ये अर्थसंकल्प ७९ कोटी रुपयांवरून ५७०९ कोटी रुपयांवर पोहचला आहे.
Web Summary : Navi Mumbai Municipal Corporation, transformed from a gram panchayat, amassed ₹55,803 crore in three decades. Twenty individuals, including two women, managed its treasury as chairpersons of the Standing Committee, funding significant development projects.
Web Summary : ग्राम पंचायत से परिवर्तित नवी मुंबई महानगरपालिका ने तीन दशकों में ₹55,803 करोड़ जमा किए। बीस लोगों, जिनमें दो महिलाएं शामिल हैं, ने स्थायी समिति के अध्यक्ष के रूप में इसके खजाने का प्रबंधन किया, जिससे महत्वपूर्ण विकास परियोजनाओं का वित्त पोषण हुआ।