शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठांना बेस्ट तिकिटात ५० टक्के सूट, महापौरांची घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 02:13 IST

महापालिकेच्या विरंगुळा केंद्रात येणा-या ज्येष्ठ नागरिकांच्या मार्गदर्शनातूच तरुण पिढीला भविष्याची दिशा मिळणार असल्याने, ज्येष्ठ नागरिकच देशाची खरी संपत्ती असल्याचे

मुंबई : महापालिकेच्या विरंगुळा केंद्रात येणा-या ज्येष्ठ नागरिकांच्या मार्गदर्शनातूच तरुण पिढीला भविष्याची दिशा मिळणार असल्याने, ज्येष्ठ नागरिकच देशाची खरी संपत्ती असल्याचे प्रतिपादन महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केले. ज्येष्ठ नागरिकांना ‘बेस्ट’च्या बस भाड्यामध्ये यापुढे ५० टक्के सूट देणार असल्याचे महापौरांनी जाहीर केले.जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन सोहळा आणि ज्येष्ठ नागरिकांचा गौरव समारंभ माटुंगा (प)च्या यशवंत नाट्य मंदिरात आयोजित करण्यात आला होता. या वेळी ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधताना महापौर बोलत होते. या प्रसंगी महाडेश्वर यांच्या हस्ते प्रारंभी वयाची ९० वर्षे पूर्ण केलेल्या सखाराम पाताडे, एम. के. फटनाणी, विरप्पा काकनकी, एस. पी. गायकवाड, प्रमिला देशपांडे, सुनंदा बागकर, रामकृष्ण केणी, मधुकर कातकर, कमला वाटणकर, सरिता शहा, जैन नायगण यांचा सत्कार करण्यात आला.नियोजन विभागाच्या सहायक आयुक्त डॉ. संगीता हसनाळे यांनी ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येणाºया सोयी-सुविधांचा या वेळी आढावा घेतला. आतापर्यंत महापालिकेने २३ विरंगुळा केंद्रे उभारली असून, २४वे केंद्र हे आर/ दक्षिण विभागात सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे, महापौरांच्या अध्यक्षतेखाली लवकरच ज्येष्ठ नागरिक संघाची स्थापना करण्यात येत असून, वर्षातून संघाच्या दोन बैठका घेणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.

टॅग्स :BESTबेस्टMumbaiमुंबई