पनवेल : नगरपालिकेच्या हद्दीत धोकादायक इमारतीची संख्या पन्नाशीच्या घरात पोहचली आहे. पालिकेने जवळपास ४६ मोडकळीस आलेल्या इमारतींना नोटिसा बजावल्या असून घरे खाली करून धोकादायक असलेले बांधकाम निष्काषित करण्याच्या सूचना दिल्या.मात्र मालक व भाडोत्र्यांमध्ये वाद या गोष्टीचा अडथळा निर्माण करीत आहे. काही महिन्यांपूर्वी मिरची गल्ली येथे मोडकळीस आलेली इमारत कोसळली. सुदैवाने जीवित हानी झाली नाही.काही ठिकाणी मालक व भाडोत्र्यांमध्ये वाद असल्याने तिथे जीव धोक्यात घालून लोक रहात असल्याने पालिकेची डोकेदुखी वाढली आहे. पनवेल हे ऐतिहासिक शहर आहे. काही जुन्या इमारती, घरे मोडकळीस आली आहेत. पुरोहित यांच्या मालकीच्या असलेल्या या इमारतीत भाडोत्री कोणत्याही परिस्थिती घर खाली करायला तयार नाही. अशीच परिस्थिती इतर ठिकाणी आहे.दीडशे वर्षांपूर्वीची नगरपालिका आहे. बंदर, व्यापारी पेठ असलेल्या या शहरात वाडे संस्कृती होती. त्याचबरोबर लहान मोठे बंगले या शहरात होते. जुन्या वाड्यांची जागा इमारतींनी घेतली असली तर आजही काही जुने बांधकाम शहरात आहेत. शहरात मोडकळीस आलेल्या सुमारे २० पेक्षा जास्त इमारतीत आजही रहिवासी राहतात. त्यामध्ये चाळींची संख्याही मोठी आहे. भाडोत्रीचे प्रमाण अधिक आहे. पनवेलमधील धोकादायक इमारती खाली करण्याकरिता नोटिसा बजावल्या, त्याचबरोबर झोन अधिकाऱ्यांनी संबंधित मालक आणि रहिवाशांबरोबर अनेकदा चर्चाही केल्या त्यांची समजूतही घालण्यात आली. वादग्रस्त ठिकाणी अनेक कुटुंबे जीव धोक्यात घालून रहात आहेत. प्रशासनाकडे इत्यंभूत आकडेवारी नसली तरी सुमारे ३०० पेक्षा जास्त लोक इमारतीत राहात आहेत.
पनवेलमध्ये ५० इमारती धोकादायक
By admin | Updated: September 3, 2015 02:58 IST