शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

बेलापूर मतदार संघात विकास कामांसाठी बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत 4.50 कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2023 17:09 IST

महाराष्ट्र शासनाने बेलापूर मतदार संघाकरिता रु. 4.50 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून दिला आहे. या करिता म्हात्रे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. 

नवी मुंबई :- आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या अथक प्रयत्नांतून बेलापूर मतदार संघाच्या विकास कामांसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजने अंतर्गत 4.50 कोटी मंजूर निधी केला झाला आहे. शहरी भागात गरीब, वंचितावर लक्ष केंद्रित करून त्यांच्या जीवनाचा दर्जा उंचावण्यासाठी शहरी भागात मुलभूत नागरी सुविधा पुरविण्यासाठी हा उपक्रम आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनाने बेलापूर मतदार संघाकरिता रु. 4.50 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून दिला आहे. या करिता म्हात्रे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. 

या निधीमुळे नवी मुंबई शहरातील विकासकामांना गती मिळणार असून या योजनेअंतर्गत पाण्याचा निचरा करण्यासाठी सांडपाणी व्यवस्थापन, सरंक्षण भिंत, ब्रिज, समाजमंदिर, उद्यान, नागरी आरोग्य केंद्र, बालवाडी, जलकुंभ उभारणे, व्यायामशाळा अशा अनेक विकास कामांमुळे नागरिकांना पायाभूत सुविधा निर्माण होणार आहेत. त्यामुळे सार्वजनिक सेवांमध्ये सुधारणा होऊन रोजगारनिर्मिती होईल. तसेच गरीब आणि सुविधाहीन  नागरिकांना लाभ मिळेल असा विश्वास आमदार  म्हात्रे यांनी व्यक्त केला.ही कामे करणार

उपलब्ध निधीच्या माध्यमातून तुर्भे विभागातील तुर्भे स्टोअरमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडच्या दोन्ही बाजूची गटारे नव्याने बांधणे, सीबीडी सेक्टर – 8, रमाबाई आंबेडकर नगर येथे सामाजिक मंदिर बांधणे व उद्यान विकसित करणे, नेरूळ येथील शिवाजी नगर येथे नागरी आरोग्य केंद्र उभारणे, नेरूळ गांधी नगर येथे बालवाडी उभारणे, तसेच इंद्रानगर येथे समाज मंदिर उभारणे याकरिता प्रत्येकी रु. 50 लाख निधी उपलब्ध केला असून नेरूळ येथील गांधीनगर येथे जलकुंभ उभारणे व तुर्भे हनुमान नगर येथे व्यायाम शाळा या करिता प्रत्येकी रु. 25 लाख निधी मंजूर केला आहे. 

तसेच नागरिकांचा गरजा आणि अपेक्षा, सार्जनिक सेवांमधील सुधारणा, प्रमुख आर्थिक घडामोडींवर प्रभाव, रोजगारनिर्मिती, गरीब आणि सुविधाहीन नागरीकांना लाभ कमी खर्चात जास्तीत जास्त सुविधांची निर्मिती होणार आहेत.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईManda Mhatreमंदा म्हात्रे