शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

प्लास्टीक वापरणाऱ्या ४५ जणांना दोन लाख ५५ हजारांचा दंड, वाशी विभागाची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2021 04:54 IST

plastic ban : नवी मुंबई महापालिका प्रशासनाने कोणत्याही प्रकारच्या प्लास्टीक पिशव्या प्रतिबंधित असून प्लास्टीक पिशव्या मार्केटमध्ये दिसताच कामा नयेत, याकरिता सातत्याने धडक कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त बांगर यांनी प्रशासनाला दिले आहेत.

नवी मुंबई : नवी मुंबईत प्लास्टीक पिशव्या वापरणाऱ्यांवर कारवाईची विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. जानेवारी महिन्यात वाशी विभागात प्लास्टीक पिशव्यांचा वापर करणारे दुकानदार, व्यापारी, फेरीवाले आदी ४५ जणांवर कारवाई करण्यात आली असून सुमारे दोन लाख ५५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.नवी मुंबई महापालिका प्रशासनाने कोणत्याही प्रकारच्या प्लास्टीक पिशव्या प्रतिबंधित असून प्लास्टीक पिशव्या मार्केटमध्ये दिसताच कामा नयेत, याकरिता सातत्याने धडक कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त बांगर यांनी प्रशासनाला दिले आहेत. त्यानुसार, महापालिकेच्या विभागस्तरावर कारवाया सुरू करण्यात आल्या आहेत. घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त बाबासाहेब राजळे यांच्या सूचनेनुसार वाशी विभाग अधिकारी महेश हंशेट्टी यांच्या मार्दर्शनाखाली स्वच्छता अधिकारी प्रल्हाद खोसे, स्वच्छता निरीक्षक सुधीर पोटफोडे, सुषमा पवार, उपस्वच्छता निरीक्षक दीपक शिंदे, विशाल खारकर, लवेश पाटील, विजय काळे, उद्धव पाटील आदी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून विभागात कारवाईचे सत्र सुरू करण्यात आले आहे. जानेवारी महिन्यात प्लास्टीक पिशव्यांचा वापर करणाऱ्या ४५ व्यापारी, दुकानदार, फेरीवाले यांच्याकडून सुमारे दोन लाख ५५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून ४५ किलोचा प्लास्टीक पिशव्यांचा साठा जप्त करण्यात आला आहे. शहर स्वच्छतेसाठी तसेच पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाने केले. 'स्वच्छ सर्वेक्षण २०२१'साठी पालिकेचे उपक्रम नवी मुंबई पालिका प्रशासनाने यंदा 'स्वच्छ सर्वेक्षण २०२१' या मोहिमेमध्ये देशात पहिला क्रमांक पटकावण्याचा निश्चय केला आहे. त्या अनुषंगाने शहरात विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या आदेशानुसार यावर्षी स्वच्छ सर्वेक्षणाच्या अनुषंगाने विविध उपक्रम हाती घेतले आहेत.  कचऱ्याचे वर्गीकरण तसेच दररोज ५० किलोपेक्षा जास्त कचरा निर्मिती करणाऱ्या सोसायट्या, वसाहतींच्याच आवारात ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी प्रकल्प राबविणे याकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे. या अभियानात नागरिकांचा सहभाग असावा यासाठी, सोसायट्या, प्रभाग, विभाग स्तरावर स्पर्धा घेण्यात येत आहेत. अशा प्रकारे आकारण्यात आला दंड कारवाईचा तपशील    घटना    दंडसार्वजनिक ठिकाणी पाळीव प्राण्यांमार्फत उपद्रव करणे    ६    ९००उघड्यावर शौचास बसणे, लघुशंका करणे, थुंकणे    ६    १५००कचरा वर्गीकरण न करणे, हरित कचरा पदपथावर टाकणे    ५    १२५०सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकून उपद्रव करणे    १७४    ४३५००प्लास्टीक पिशव्यांचा वापर करणे    ४५    २५५०००एकूण    २३६    ३०२१५०

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीNashikनाशिक