शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

१३ जानेवारीपासून खारकोपर-उरण दरम्यान ४० उपनगरीय रेल्वे सेवा सुरू होणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2024 22:14 IST

खारकोपर-उरण दरम्यानच्या दुसऱ्या टप्प्याचे   ईएमयू ट्रेनच्या उद्घाटनास हिरवा झेंडा दाखवून  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आला.

- मधुकर ठाकूर 

उरण : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  शुक्रवारी (१२)  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ मैदानातुन उरण -खारकोपर रेल्वे मार्गाचे लोकार्पण केले आहे.१३ जानेवारी २०२४ पासून खारकोपर ते उरण दरम्यान ४० उपनगरीय रेल्वे सेवा सुरू होणार असल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून दिली आहे.

खारकोपर-उरण दरम्यानच्या दुसऱ्या टप्प्याचे   ईएमयू ट्रेनच्या उद्घाटनास हिरवा झेंडा दाखवून  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आला. खारकोपर-उरण १४.६० मार्ग किमी दुहेरी मार्ग विभाग हा बेलापूर-सीवूड-उरण विभागाच्या २७ मार्ग किमी दुहेरी मार्ग प्रकल्पाचा एक भाग आहे .ज्याची एकूण किंमत ३००० कोटी आहे. १४३३ कोटी खर्चाचा दुसरा टप्पा  कार्यान्वित करण्यात आला आहे.  यामध्ये रेल्वेचा ३३%  आणि सिडकोचा ६७% शेअरींग आहे. यामध्ये शेमतीखार, न्हावा शेवा, द्रोणागिरी आणि उरण या ४ नवीन स्थानकांसह विभागात १ महत्त्वाचा पूल, २ मोठे पूल, ३९ छोटे पूल, ३ रोड ओव्हर ब्रिज आणि ३ रोड अंडर ब्रिजचा समावेश आहे. 

सध्या नेरूळ- बेलापूर आणि खारकोपर दरम्यान चालणाऱ्या ४० उपनगरीय सेवा (२० जोड्या) आता  १३ जानेवारीपासून उरणपर्यंत वाढवण्यात आल्या आहेत. आणि त्या शेमतीखार, न्हावा-शेवा आणि द्रोणागिरी स्थानकावर थांबतील.उरण ते बेलापूर ते नेरुळ स्थानकांदरम्यान गर्दीच्या वेळेत सेवांची वारंवारता प्रत्येक ३० मिनिटांनी, बेलापूर ते उरण आणि नेरुळ ते उरण स्थानकांदरम्यान गर्दीच्या वेळेत ६० मिनिटे असेल. 

या विस्तारित मार्गावर सकाळ आणि संध्याकाळच्या गर्दीच्या वेळेत एकूण १० सेवा धावतील. ईएमयू ट्रेनच्या या विस्तारित सेवा विद्यार्थी, व्यापारी, दैनंदिन प्रवाश्यांना परवडणारी आणि पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्था पुरवून मदत होईल त्यामुळे एसईझेड क्षेत्र आणि नवी मुंबईशी संपर्क वाढवतील असेही मध्य रेल्वे प्रशासनाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून म्हटले आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईMumbai Localमुंबई लोकल