शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

‘नैना’तील ४० टक्के जमीन शेतकऱ्यांची; सिडकोचा निर्णय, २३ गावांवर लक्ष केंद्रित

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2022 09:53 IST

मुंबईपेक्षा दुप्पट क्षेत्रफळ असलेल्या नैना क्षेत्राचा विकास विविध कारणांमुळे खुंटला आहे. त्या

- कमलाकर कांबळेलोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : नैना क्षेत्राच्या विकासासाठी सिडकोने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू करून सध्या पहिल्या टप्प्यात २३ गावांच्या पथदर्शी प्रकल्पावर लक्ष केंद्रित केले आहे. टीपी स्कीम म्हणजेच नगररचना परियोजनेअंतर्गत पहिल्या टप्प्याचा विकास करण्याची सिडकोची योजना आहे.  त्यात सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांच्या  एकूण जमिनीपैकी ६० टक्के जमीन सिडको स्वत:कडे ठेवणार असून, उर्वरित ४० टक्के जमीन अडीच एफएसआयसह संबंधित शेतकऱ्याला फ्री होल्ड तत्त्वावर देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सिडकोने घेतला आहे.

मुंबईपेक्षा दुप्पट क्षेत्रफळ असलेल्या नैना क्षेत्राचा विकास विविध कारणांमुळे खुंटला आहे. त्यामुळे या क्षेत्रातील शेतकरी आणि विकासकांचा नैनाला विरोध होत आहे. असे असले तरी  सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी यासंदर्भात सकारात्मक पावले उचलली आहेत. शेतकरी आणि भूधारकांचा विरोध लक्षात घेऊन परतावा म्हणून दिली जाणारी ४० टक्के जमीन लिज होल्ड न करता फ्री होल्ड करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या ४० टक्के जमिनीची संपूर्ण मालकी संबंधित शेतकऱ्यांची असणार आहे. त्याचबरोबर विकासाला मारक ठरणाऱ्या विविध घटकांचा अभ्यास करून त्याचे निराकारण करण्यावर सिडकोने भर दिला आहे. 

आंतरराष्ट्रीय सल्लागार संस्थेच्या नेमणुकीचा विचार    नैना क्षेत्राच्या विकासासाठी आंतरराष्ट्रीय सल्लागार संस्थेची नेमणूक करण्याची योजना आहे. तसेच  संपादित जमिनीची विक्री करण्यासाठी लॅण्ड डिस्पोझल ॲक्टमध्ये बदल करावा, असा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे.    सुनियोजनासाठी टीपी स्कीमचा आकार लहान करून प्रत्येक स्कीमसाठी स्वतंत्र लवाद नेमण्याची योजना आहे.     नैना क्षेत्रातील भूसंपादन आणि इतर संबंधित प्रक्रियांना गती मिळावी, यासाठी सिडकोतच विभागीय महसूल आयुक्त दर्जाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याची प्रतिनियुक्तीवर नेमणूक करावी, अशी मागणीही राज्य शासनाकडे यापूर्वीच केली आहे.

२३ गावांतील तीन हजार हेक्टर क्षेत्र‘नैना’च्या पहिल्या टप्प्यात २३ गावांतील तीन हजार हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. संपूर्ण ‘नैना’चा हा पायलट प्रोजेक्ट आहे. यात एकूण ११ टीपी स्कीम प्रस्तावित केल्या आहेत.

टॅग्स :cidcoसिडको