शहरं
Join us  
Trending Stories
1
School Bus Accident: भयानक अपघात! ट्रेन जात असताना स्कूल बस आडवी आली; चिंधड्या उडाल्या, दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू
2
'मराठी मोर्चा' रोखण्यासाठी पोलिसांची रात्रभर घरात घुसून धरपकड, मीरा भाईंदरमध्ये बंदोबस्त वाढवला
3
चार मुलांची आई कुवेतला जाऊन प्रियकराला घेऊन आली; आपल्याच घरात राहतायत हे पतीला कळताच...
4
डोनाल्ड ट्रम्प यांना आव्हान देणं मस्क यांना महागात? आधी टेस्ला गडगडली, आता संपत्तीला खिंडार!
5
व्यावसायिक गोपाल खेमका हत्या प्रकरण: मुख्य आरोपी एन्काउंटरमध्ये ठार, झाला मोठा खुलासा
6
 F&O नं दिलाय जोरदार झटका, आर्थिक वर्षात गुंतवणूकदारांचे ₹१.०६ लाख कोटी बुडाले; SEBI नं काय म्हटलं?
7
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानी युद्धनौका बंदरातच का नांगरलेल्या होत्या? मोठी माहिती समोर, लढायच्याच स्थितीत नाहीत
8
Stock Market Today: ५५ अंकांच्या घसरणीसह उघडला सेन्सेक्स; या दोन क्षेत्रांवर दबाव, बाजारात तेजी का दिसून येत नाहीये?
9
Mumbai Crime: 'तो' व्हिडीओ अन् तीन कोटी, मुंबईत सीएने आयुष्यच संपवले, सुसाईड नोटमध्ये काय?
10
डॅालर्स नाही लोकल करन्सी… रशियाच्या प्लाननं ट्रम्प यांचा तिळपापड, भारताला होणार का मोठा फायदा?
11
Viral Video: देव न दिसे देवळात, माझे पांडुरंग घरात; वारीतून पतललेल्या बापासाठी लेकीनं केलं असं काही, होतंय कौतुक!
12
बॉयफ्रेंडसोबत फिरायला गेली, दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद झाला; पुढे जे झालं ते ऐकून उडेल अंगाचा थरकाप
13
मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई
14
तुलसी Is Back! १७ वर्षांनी 'क्योंकी सास भी...'चा सीक्वल, स्मृती इराणीची पहिली झलक, 'या' दिवशी सुरू होणार
15
अमेरिकेवर संकट! उन्हाळी कँपिंगला गेलेल्या, २८ लहान मुली बुडाल्या; ४५ मिनिटांत २६ फूट पाणी वाढले...
16
"आता जगायचंच नाही! मी बायकोला त्रासलोय"; तरुणाची थेट राष्ट्रपतींकडे धाव! म्हणाला...
17
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
18
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
19
रशियाचा युक्रेनवर पुन्हा मोठा हल्ला, ११ ठार, ८० हून अधिक जखमी; रशियन मंत्र्याचाही मृत्यू
20
"महाराष्ट्राला आम्ही पोसतोय" म्हणणाऱ्या निशिकांत दुबेंना चिन्मयी सुमीतचं हिंदीतून सडेतोड उत्तर, म्हणाली- "त्या खासदाराला..."

हार्बर मार्गावर दोन वर्षांत ३७४ प्रवाशांनी गमावला जीव

By admin | Updated: December 27, 2016 02:56 IST

शहरातील सर्वसामान्य नागरिक प्रवासाकरिता रेल्वेचा मार्ग निवडतात. सकाळी तसेच सायंकाळच्या या कार्यालयीन वेळांमध्ये प्रवासी जीव मुठीत घेऊन प्रवास करतात.

- प्राची सोनवणे,  नवी मुंबई

शहरातील सर्वसामान्य नागरिक प्रवासाकरिता रेल्वेचा मार्ग निवडतात. सकाळी तसेच सायंकाळच्या या कार्यालयीन वेळांमध्ये प्रवासी जीव मुठीत घेऊन प्रवास करतात. रेल्वे अपघातांमध्ये या २०१५जानेवारी ते २०१६ नोव्हेंबर या दोन वर्षांमध्ये ३७४ प्रवाशांनी जीव गमावला आहे. यामध्ये २२१ प्रवासी रेल्वे रूळ ओलांडताना मृत्युमुखी पडले तर १८४ प्रवाशांना लोकल डब्यातून तोल जाऊन पडल्याने जीव गमवावा लागला आहे.हार्बर मार्गावरील नवी मुंबईतील सानपाडा, बेलापूर, तुर्भे रेल्वे स्थानकांवरील फलाटांची उंची वाढविण्यात आली आहे. अपघात झाल्यानंतर पहिल्या एक तासात म्हणजेच ‘गोल्डन अवर’मध्ये अपघातग्रस्ताला तातडीने वैद्यकीय उपचार मिळाल्यास त्याचा जीव बचावण्याची दाट शक्यता असते. मात्र रेल्वे यंत्रणेकडे याच तत्परतेचा अभाव असल्याचे दिसून येते. वाढते अपघात पाहता रेल्वे प्रशासनाकडून वाशी रेल्वे स्थानकाजवळ रुग्णालय उभारण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला आहे. नवी मुंबईतील हार्बर मार्गावरील बेलापूर ते वाशी तसेच ट्रान्स हार्बर मार्गावरील ऐरोलीच्या दिशेने प्रवास करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याठिकाणी असलेला कामगारवर्ग वेळ आणि शारीरिक श्रम वाचविण्याकरिता रेल्वे रूळ ओलांडणे, सुरक्षा भिंतींवरून उडी मारण्यासारख्या पर्यायाचा वापर करत असल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली. रेल्वेचे रूळ ओलांडणे धोकादायक आहे अशी वारंवार रेल्वे प्रशासनाकडून उद्घोषणा होते, मात्र त्याकडे प्रवासी दुर्लक्ष करतात. गेल्या दोन वर्षात लोकलच्या दारात उभे राहून प्रवास करताना १५७ व्यक्ती गंभीर जखमी झाल्या आहेत, तर तोल सावरला न गेल्याने अनेकांना जीव गमवावा लागला आहे. २०१५ या वर्षात १०९ प्रवासी रूळ ओलांडताना मृत्युमुखी पडले आहेत तर ७२ प्रवाशांना तोल जाऊन जीव गमवावा लागला. २०१६ मध्ये नोव्हेंबर दरम्यान ११२ प्रवाशांनी रूळ ओलांडताना जीव गमाविला तर ५८ प्रवासी तोल जाऊन पडल्याने मृत्युमुखी पडले आहेत. रेल्वे पोलिसांकडून जनजागृतीरेल्वे पोलिसांकडून दर महिन्याला सुरक्षित प्रवासाच्या दृष्टीने जनजागृती मोहीम राबविल्या जातात. शाळा, महाविद्यालयांत सुरक्षित रेल्वे प्रवासाविषयी जनजागृती, उपाययोजनांची माहिती देण्यात असून जनजागृती पत्रकांचे वाटप करण्यात आले. रेल्वे प्रशासनासोबत पत्रव्यवहारहार्बर मार्गावरील संरक्षण भिंती खचल्याने अनेकदा रेल्वे प्रशासनाशी पत्रव्यवहार केल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली. अनेकदा पाठपुरावा करून स्थानक परिसरातील संरक्षण भिंतींचे काम पूर्ण करण्यात आले.प्रवाशांचा बेजबाबदारपणारूळ ओलांडणे अथवा समांतर चालणे हे बेकायदेशीर आहे. मोबाइल फोन, हेडफोन कानाला लावून रूळ ओलांडले जातात. सुरक्षिततेच्या बाबतीत प्रवासी बेजबाबदारपणे वागत असल्यानेही अपघातांमध्ये वाढ होत असल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली. मुंबईत नवीन गाड्या आल्यात त्यासाठी २५ हजार व्होल्ट्सच्या तारांचे विद्युतीकरण झाले आहे. त्याबाबत रेल्वे सतत धोक्याची सूचना देत असते, तरीही स्टंटबाजी करत टपावर चढून प्रवास केला जातो. यामध्ये तरुणांची संख्या जास्त असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. - अपघाताचे प्रमाण कमी करण्याकरिता रेल्वे प्रशासन कुचकामी ठरते. अपघातग्रस्त व्यक्ती तेथेच जखमी अवस्थेत पडून असते. प्रथमोपचाराची सेवा त्वरित उपलब्ध होत नाही, तसेच रेल्वे कर्मचारी तेथे हजर नसतो. त्यामुळे जखमी प्रवाशाला तत्काळ उपचार मिळत नाहीत. रेल्वेने प्रत्येक स्थानकात उपचार सुविधा व्यवस्था करावी अशी प्रतिक्रिया नेरुळ येथील प्रवासी अनघा दळवी यांनी व्यक्त केली आहे.रेल्वे पोलिसांकडून अनेक उपाययोजना राबविल्या जात असून प्रवाशांनी मानसिकता बदलणे गरजेचे आहे. रूळ ओलांडणाऱ्या तरुणांच्या कानात असलेले हेडफोन जीवघेणे ठरू शकते. प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना रेल्वे पोलिसांकडून राबविल्या जात आहेत, मात्र प्रवाशांनीही सहकार्य केले पाहिजे आणि सतर्क राहिले पाहिजे.- प्रमोद ढावरे, पोलीस निरीक्षक, वाशी रेल्वे स्थानक