शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

३५ हजार कुटुंबीयांकडे गॅस सिलिंडर नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2018 05:00 IST

स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाऱ्या नवी मुंबईतील तब्बल ३५ हजार कुटुंबीयांकडे गॅस सिलिंडर नसल्याचे निदर्शनास आले आहे. केंद्र शासनाच्या योजनेचा लाभही या नागरिकांना मिळालेला नाही.

- अनंत पाटीलनवी मुंबई - स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाऱ्या नवी मुंबईतील तब्बल ३५ हजार कुटुंबीयांकडे गॅस सिलिंडर नसल्याचे निदर्शनास आले आहे. केंद्र शासनाच्या योजनेचा लाभही या नागरिकांना मिळालेला नाही. या नागरिकांना इंधन म्हणून रॉकेलचा वापर करावा लागत आहे. वाशी शिधावाटप कार्यालयामधील अपुरा कर्मचारी वर्ग व प्रशासकीय उदासीनतेमुळे १०० टक्के नागरिकांपर्यंत गॅस पुरविण्यात अपयश आले आहे.घणसोली ते बेलापूरपर्यंत शासनमान्य स्वस्त धान्य शिधावाटप दुकानांची एकूण संख्या ९४ असून, त्यापैकी नऊ दुकाने विविध कारणांमुळे निलंबित आहेत. मात्र, उर्वरित ८५ शिधावाटप दुकानांचा कारभार वाशी पोलीस ठाण्यासमोरील वाशी शिधावाटप कार्यालयामार्फत चालतो. या कार्यालयात एकूण १ लाख ४४ हजार ३१९ शिधावाटप कार्डधारकांची संख्या असून, त्यापैकी ३५ हजार कार्डधारकांकडे गॅस सिलिंडर जोडणी नाही. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या पंतप्रधान उज्ज्वल योजनेचा लाभ अद्याप मिळालेला नाही. नवी मुंबईसारख्या स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू असलेल्या शहरामध्येहीहजारो कुटुंबीयांकडे गॅसजोडणी नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.शासनाच्या अन्न सुरक्षा योजनेंतर्गत येणाºया कार्डधारकांना दोन रुपये किलो दराने गहू, तीन रुपये किलो दराने तांदूळ दिला जातो. गॅसजोडणी नसल्यामुळे इंधन म्हणून रॉकेलचा वापर करावा लागत आहे. सद्यस्थितीत वाशी कार्यालयांतर्गत येणाºया ८५ दुकानांना दरमहा ७० हजार लीटर रॉकेलचा पुरवठा केला जातो.रॉकेलसाठी बोगस शिधापत्रिका तयार केल्या आहेत का, याची छाननी करण्याची मागणीही केली जात आहे. शिधावाटप कार्यालयात पुरेसे कर्मचारी नाहीत. ८५ दुकानांसाठी केवळ आठ निरीक्षक आहेत. शिपाई फक्त एकच असल्यामुळे नागरिकांची कामे होण्यास विलंब होत आहे. आठ निरीक्षकांसाठी किमान आठ संगणकांची गरज आहे, परंतु चार संगणकांवर काम केले जात आहे. यामुळे शिधापत्रिकाधारकांना तासन्तास ताटकळत कधी काम होईल, म्हणून उभे राहावे लागत आहे. गतमहिन्यात शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा खात्याकडून प्रत्येक दुकानात २५० किलो तूरडाळ आली होती, परंतु त्याचे योग्य प्रमाणात वितरण झालेले नाही.‘दीड लाख शिधापत्रिकाधारकांची संख्या असलेल्या वाशी ४१ एफ अंतर्गत शिधावाटप कार्यालयात शिपाई, निरीक्षक, लिपिक वाढविणे आवश्यक आहे. शिधापत्रिकाधारकांना विविध कामांसाठी आमच्या वाशी कार्यालयाकडून सर्वोतोपरी सहकार्य केले जाते, पण अपुºया कर्मचारी संख्येमुळे काही वेळा विलंब होतो. हे खरे असले, तरी नागरिकांकडूनही सहकार्याची अपेक्षा आहे.’- एकनाथ पवार, शिधावाटप नियंत्रक,अधिकारी ४१ फ, वाशी.

टॅग्स :Cylinderगॅस सिलेंडरNavi Mumbaiनवी मुंबई