शहरं
Join us  
Trending Stories
1
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
3
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
4
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
5
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
6
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
7
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न
8
Road Rage Case: ट्रक चालकाचे अपहरण; पूजा खेडकरच्या वडिलांच्या ड्रायव्हरला अटक, आई- वडील फरार
9
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
10
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
11
सूर्य ग्रहण २०२५: चंद्रग्रहणात केला तोच उपाय सूर्यग्रहणातही, साठवणीच्या अन्न-पाण्यावर ठेवा तुळशीचे पान 
12
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
13
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
14
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
15
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
16
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
17
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
18
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
19
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
20
ठाण्यातील अवजड वाहन बंदीचा ताप! मुंबई अहमदाबाद महामार्गावर देखील अवजड वाहनांना बंदी

अनधिकृत बांधकाम करणाऱ्या ३४४ जणांवर गुन्हे दाखल

By admin | Updated: April 12, 2017 03:48 IST

अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांविरोधात महापालिकेने धडक मोहीम सुरू केली आहे. जानेवारीपासून तब्बल ३४४ जणांवर गुन्हे दाखल केले असून, मागील दहा दिवसांमध्ये सर्वाधिक

- नामदेव मोरे, नवी मुंबई

अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांविरोधात महापालिकेने धडक मोहीम सुरू केली आहे. जानेवारीपासून तब्बल ३४४ जणांवर गुन्हे दाखल केले असून, मागील दहा दिवसांमध्ये सर्वाधिक १७४ गुन्ह्यांचा समावेश आहे. नोटीस पाठवूनही बांधकाम न थांबविणाऱ्यांवर यापुढे कडक कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. नवी मुंबईमधील अनधिकृत बांधकामांवर नियंत्रण मिळविण्यासाठी पालिका प्रशासनाने कडक भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. सर्व विभाग अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रामधील रस्ते, पदपथ व इतर ठिकाणी जागा अडवून बसलेल्या फेरीवाल्यांवर नियमितपणे कारवाईचे आदेश दिले आहेत. पालिकेची परवानगी न घेता एमआयडीसी, सिडको, पालिका व इतर सरकारी जागेवर उभारण्यात आलेली बांधकामे निष्कासित करण्याची मोहीम राबविण्यास सुरुवात झाली आहे. शहरात विनापरवाना बांधकाम करणाऱ्यांना यापूर्वीच नोटीस दिल्या आहेत. नोटीस देऊनही ज्यांनी अतिक्रमण थांबविले नाही त्यांच्याविरोधात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. चार दिवसात एपीएमसी पोलीस स्टेशनमध्ये आठ गुन्हे दाखल झाले असून, अजून जवळपास ३२ ते ३५ गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. कोपरखैरणे व इतर परिसरातही अशाचप्रकारे गुन्हे दाखल केले जात आहेत. पालिकेच्या या मोहिमेमुळे अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. पालिका आयुक्त रामास्वामी एन. यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण उपआयुक्त अमरिष पटनिगिरे व त्यांच्या पथकाने प्रत्येक नोडमधील बांधकामांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. आतापर्यंत महापालिका क्षेत्रामध्ये ३४४ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. यामधील तब्बल १७४ गुन्हे दहा दिवसांमध्ये दाखल झाले आहेत. पालिका प्रशासनाने पोलीस उपआयुक्तांना पत्र देऊन अतिक्रमण करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून गुन्ह्याचा तपास वेगाने करण्याचे सूचित केले आहे. अनधिकृत बांधकामांना आळा बसावा यासाठी ही कारवाई सुरू केली आहे. शहरात कुठेही अनधिकृत बांधकाम सुरू असल्याचे निदर्शनास आल्यास तत्काळ कारवाई करण्यात येणार आहे. सद्यस्थितीतील बांधकाम त्वरित थांबवून भूखंड जसा होता तसा करावा, असेही आदेश देण्यात आले आहेत. - कोपरी गाव, सेक्टर २६ ए महापालिका शाळेजवळ १८ मीटर लांब व आठ मीटर रुंद भूखंडावर चार मजली इमारतीचे बांधकाम अनधिकृतपणे करण्यात येत असल्यामुळे दयाळ अर्जुन भोईर विरोधात ९ एप्रिलला गुन्हा दाखल. - कोपरी गाव घर क्रमांक १४२४च्या बाजूच्या बेकरी शेजारी नऊ मीटर लांब व नऊ मीटर रुंद भूखंडावर विनापरवाना दोन मजली इमारतीचे बांधकाम केल्यामुळे मनोज मोहन पाटील विरोधात गुन्हा दाखल. - कोपरी गाव सेक्टर २६ ए भूखंड क्रमांक १४५० व १४५१वर विनापरवाना चार मजली इमारतीचे बांधकाम करण्यात आले. जानेवारी २०१७ला नोटीस पाठवूनही बांधकाम थांबविले नसल्याने भारती शिवाजी कोटीयन व विशाल पाटील विरोधात गुन्हा दाखल. - कोपरखैरणे सेक्टर ५मधील रूम नंबर ३११ मधील शेख फकरुद्दीन मोहम्मद, सेक्टर ६मधील शीतल प्रसाद मौर्य व सेक्टर ७, रूम नंबर ३७३चे पंकज वाडकर यांनी मे २०१५ ते एप्रिल अखेरपर्यंत अनधिकृतपणे बांधकाम केले. यामुळे तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. - कोपरखैरणे सेक्टर २२मधील यशोदीप को-आॅपरेटिव्ह सोसायटीमधील १९ सदनिकाधारकांनी अनधिकृत बांधकाम केले आहे. आॅगस्ट २०१६ मध्ये अनधिकृत बांधकाम निदर्शनास आल्यानंतर त्यांना नोटीस देण्यात आली होती; पण नोटीसचे उल्लंघन करून बांधकाम सुरू ठेवल्यामुळे सदनिकाधारकांवर गुन्हे दाखल केले आहेत. - कोपरी गाव पालिका शाळेजवळ ८.४० मीटर लांब व ७.९० मीटर रुंद भूखंडावर दोन मजली बांधकाम केल्याप्रकरणी संतोष गोपीनाथ पाटील विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. - कोपरी गावातील घर क्रमांक १६६८जवळ रवी पाटील यांनी विनापरवाना दोन मजली इमारतीचे बांधकाम सुरू केले आहे. सप्टेंबर २०१६मध्ये हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर पालिकेने नोटीस दिली होती; पण बांधकाम न थांबविल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. - कोपरी गाव कुलदैवत मैदानाजवळ सात मीटर लांब व रुंद भूखंडावर चार मजली इमारतीचे बांधकाम करण्यात आले आहे. या प्रकरणी नारायण पदाजी भोईर विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. - कोपरी गावाजवळील राममंदिराजवळ चार मजली इमारतीचे काम सुरू असल्याने नोव्हेंबर २०१६मध्ये निदर्शनास आले. याप्रकरणी कृष्णा भोईर व प्रदीप भोईर विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.