शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

कोपरीतून ३२ किलो गांजा जप्त, तिघांना अटक  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 07:04 IST

अमली पदार्थ विरोधी पथकाने कोपरी येथून ३२ किलो गांजा जप्त करून तिघांना अटक केली आहे. एक जण कोपरीचा राहणारा असून, उर्वरित दोघे जण कर्नाटकमधून गांजा घेऊन आले होते.

नवी मुंबई : अमली पदार्थ विरोधी पथकाने कोपरी येथून ३२ किलो गांजा जप्त करून तिघांना अटक केली आहे. एक जण कोपरीचा राहणारा असून, उर्वरित दोघे जण कर्नाटकमधून गांजा घेऊन आले होते. हा गांजा ठाण्यात विक्रीसाठी पाठवला जाण्यापूर्वीच पोलिसांनी सापळा रचून त्यांना अटक केली आहे.गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने २९ व ३० जानेवारी रोजी सलग दोन रात्री कोपरी येथे सापळा रचून ही कारवाई केली आहे. एक व्यक्ती गांजाची विक्रीसाठी त्याठिकाणी येणार असल्याची माहिती उपनिरीक्षक राणी काळे यांना मिळाली होती. या प्रकाराची माहिती त्यांनी वरिष्ठांना दिली असता, गुन्हे शाखा उपआयुक्त तुषार दोशी, सहायक आयुक्त नीलेश राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक सुनील बाजारे यांनी दोन पथक तयार केले होते. एका पथकाचे प्रमुख वरिष्ठ निरीक्षक सुनील बाजारे तर दुसºया पथकाचे प्रमुख राणी काळे होत्या. या पथकात हवालदार रमेश उटगीकर, संजयसिंग ठाकूर, इकबाल शेख, सांगोलकर, कासम पिरजादे, सलीम इनामदार, संजय चौधरी, सचिन भालेराव, राजेश गाढवे, आकाश मुके यांचा समावेश होता.त्यांनी २९ जानेवारी रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास कोपरी येथील पुनीत टॉवरलगतच्या परिसरात सापळा रचला होता. त्या ठिकाणी संशयास्पदरीत्या वावरणाºया दस्तगीर शेख (४५) याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक किलो गांजा आढळला होता. पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता, त्याने पळून जाण्याचाही प्रयत्न केला. मात्र, त्याचा पाठलाग करून पकडण्यात आले. त्याच्या अटकेनंतर मंगळवारी चौकशीदरम्यान त्याने इतर दोन साथीदारांची माहिती दिली. ते दोघे जण मोठ्या प्रमाणात गांजा घेऊन त्याला मंगळवारीच भेटणार होते, अशी माहिती देखील त्याने दिली. हा गांजा घेऊन तो ठाण्यामध्ये काही ठिकाणी विक्रीसाठी पुरवणार होता. त्यानुसार बाजारे व काळे यांच्या पथकाने पुन्हा दस्तगीर राहत असलेल्या कोपरी परिसरात सापळा रचला होता. शेखने दिलेल्या माहितीनुसार गांजा घेऊन येणारे साथीदार ठरलेल्या ठिकाणी पदपथावर उभे राहणार होते. यानुसार बाजारे यांचे पथक तिथल्या हालचालीवर लक्ष ठेवून असतानाच दोघे संशयित आढळून आले.दत्तात्रेय जाधव (२८) व अंकुश राठोड (२७) अशी त्यांची नावे आहेत. दोघेही कर्नाटकचे राहणारे असून झडतीमध्ये त्यांच्याकडे ३० किलो ५५० ग्रॅम गांजा आढळून आला. त्यानुसार सलग दोन दिवस केलेल्या कारवाईत सुमारे ३२ किलो गांजा जप्त केला आहे. याप्रकरणी अटक केलेल्या तिघांवरही एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना ३ फेब्रुवारीपर्यंतची कोठडी मिळाली आहे.जप्त केलेला गांजा ठाण्यात काही ठिकाणी विक्रीसाठी पाठवला जाणार होता, अशी कबुली शेखने दिल्याचे वरिष्ठ निरीक्षक सुनील बाजारे यांनी सांगितले. 

टॅग्स :Crimeगुन्हा