नवी मुंबई : महापालिकेला सिडकोकडून एकूण ३000 भूखंड हवे आहेत. त्या दृष्टीने महापालिकेचा सिडकोकडे पाठपुरावा सुरू आहे. अलीकडेच झालेल्या बैठकीत सिडकोच्या सह व्यवस्थापकीय संचालिका व्ही. राधा यांनी सदर भूखंड महापालिकेला देण्यासंदर्भात तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या आहेत. त्यामुळे विविध सामाजिक प्रयोजनासाठी सिडकोने आरक्षित ठेवलेले हे भूखंड लवकरच महापालिकेच्या ताब्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.सिडकोने नवी मुंबईच्या विविध भागात सामाजिक उपक्रमासाठी मोठ्या प्रमाणात भूखंड आरक्षित करून ठेवले आहेत. नागरिकांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी हे भूखंड मिळावेत, यासाठी महापालिकेचा सिडकोकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. सिडकोने आतापर्यंत महापालिकेकडे ६00 भूखंड वर्ग केले आहेत. महापालिकेला अद्यापि जवळपास ३000 भूखंड आहेत. हव्या असलेल्या या भूखंडांची नोडनिहाय यादी महापालिकेच्या संबधित विभागाने सिडकोला सादर केली आहे.यासंदर्भात महापालिकेच्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालिका व्ही. राधा यांच्याबरोबर बैठक झाली. त्यात राधा यांनी सकारात्मक निर्णय घेत संबधित विभागाला कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार बेलापूर नोडपासून भूखंड हस्तांतरणाची कार्यवाही सुरू करण्यात आल्याचे महापालिकेच्या संबधित विभागाकडून सांगण्यात आले.
महापालिकेला सिडकोकडून हवेत ३000 भूखंड
By admin | Updated: March 18, 2016 00:18 IST