शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

स्टार प्रजातीची 293 कासवे जप्त, दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2018 19:22 IST

कर्नाटक येथून नवी मुंबईत विक्रीसाठी आणलेली स्टार प्रवर्गातील 293 कासवे जप्त करण्यात आली आहेत.

- सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई : कर्नाटक येथून नवी मुंबईत विक्रीसाठी आणलेली स्टार प्रवर्गातील 293 कासवे जप्त करण्यात आली आहेत. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरोधात वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महसूल गुप्त वार्ता, वन्यजीव अपराध नियंत्रण कक्ष व वन्यपरिक्षेत्र विभागामार्फत ही कारवाई करण्यात आली आहे.वाशी येथे काही व्यक्ती मोठ्या संख्येने कासवे घेऊन येणार असल्याची माहिती महसूल गुप्त वार्ता विभागाच्या अधिका-यांना मिळाली होती. त्यानुसार पी. थॉमस, हर्षद सावंत, राहुल सोनवणो तसेच वन्यजीव रक्षक सुनीष कुंजू यांनी वाशी प्लाझा परिसरात शनिवारी दुपारी सापळा रचला होता. या वेळी पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणा-या शिवनेरी बसमधून उतरलेल्या दोघांवर त्यांना संशय आला. यानुसार त्यांच्याकडील बॅगांची झडती घेतली असता, त्यामध्ये मोठय़ा संख्येने कासवे आढळून आली. त्यांना ताब्यात घेतले असता त्यांच्याकडे स्टार प्रवर्गातील लहान-मोठी 293 कासवे आढळून आली. वन्यजीव अपराध नियंत्रण कक्षाच्या तक्रारीनुसार दोघांवर वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. श्रीकांत लिंगाराजू (20) व कोंडिया लिंगाराजू (27) अशी त्यांची नावे आहेत. दोघेही मूळचे कर्नाटकचे राहणारे आहेत. वाशी पाळीव प्राणी विक्री केंद्र चालक तानाजी कलंगे याला विकण्यासाठी त्यांनी कासवे आणल्याची कबुली दिली. मात्र, कारवाईची माहिती मिळताच तो पळाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.अटक केलेल्या दोघांवर यापूर्वी देखील 900 कासवांच्या तस्करी प्रकरणी कोलकाता पोलिसांनी कारवाई केलेली आहे. त्यानुसार या रॅकेटमध्ये इतरही अनेकांचा सहभाग असल्याची शक्यता वन्यजीव रक्षक सुनीष कुंजू यांनी वर्तवली आहे. हौसेखातर घरामध्ये वापरासाठी अथवा फेंगशुई म्हणून कासवांचा वापर केला जातो. मात्र, कासव पाळण्यास बंदी असतानाही गुप्त धनाच्या प्राप्तीसाठी देखील अनेकांकडून छुप्या मार्गाने कासवांचा वापर केला जातो. त्यानुसार पोलिसांना पाहिजे असलेला तानाजी कलंगे हाती लागल्यास अशा अनेक हौसींचा उलगडा होण्याची शक्यता आहे.