शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

वर्षभरात दुचाकीचे २८६ अपघात, १२७ जण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 05:22 IST

पोलीस आयुक्तालय क्षेत्रामध्ये एक वर्षामध्ये मोटारसायकलचे तब्बल २८६ अपघात झाले असून १२७ जणांचा मृत्यू झाला आहे. हेल्मेटचा वापर न केल्यामुळे जीवितहानीचे प्रमाण वाढत असल्यामुळे वाहतूक पोलिसांनी कॅम्पस विथ हेल्मेट अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

नवी मुंबई : पोलीस आयुक्तालय क्षेत्रामध्ये एक वर्षामध्ये मोटारसायकलचे तब्बल २८६ अपघात झाले असून १२७ जणांचा मृत्यू झाला आहे. हेल्मेटचा वापर न केल्यामुळे जीवितहानीचे प्रमाण वाढत असल्यामुळे वाहतूक पोलिसांनी कॅम्पस विथ हेल्मेट अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे.नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रामधून सायन - पनवेल महामार्ग, जुना मुंबई - पुणे महामार्ग, मुंबई- गोवा महामार्ग, ठाणे-बेलापूरसह पामबीच रोड हे प्रमुख रस्ते आहेत. या मार्गांवर अपघातही मोठ्या प्रमाणात होत असतात. २०१८ मध्ये आयुक्तालय क्षेत्रामध्ये तब्बल १२०३ अपघात झाले आहेत. या अपघातांमध्ये ९२० जण जखमी झाले असून २५८ जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातामध्ये २८६ अपघात मोटारसायकलचे आहेत. यामध्ये २५२ जण जखमी झाले असून १२७ जणांचा मृत्यू झाला आहे. मोटारसायकल अपघाताच्या ५० टक्के अपघातामध्ये चालकाचा मृत्यू झाला आहे. हेल्मेटचा वापर न केल्यामुळे जीवितहानी होण्याचा व डोक्याला गंभीर दुखापत होण्याचे प्रमाण वाढत आहे. हेल्मेटचा वापर न करणाऱ्यांविरोधात पोलीस नियमित कारवाई करत असतात, परंतु यानंतरही दुचाकीस्वार हेल्मेटचा वापर करत नाहीत. यामुळे पोलिसांनी कॅम्पस विथ हेल्मेट उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.१९ मार्चला ऐरोली नॉलेज पार्क येथून हे अभियान सुरू केले जात आहे. पोलीस आयुक्त संजीव कुमार स्वत: उपस्थित राहणार आहेत.अपघातांचे प्रमाण चिंताजनकआयुक्तालय क्षेत्रामध्ये किमान रोज एक मोटारसायकलचा अपघात होत आहे. दोन दिवसामधून एक गंभीर अपघात होत असून प्रत्येक तिसऱ्या दिवशी एकाचा मृत्यू होत आहे. मोटारसायकल अपघातामध्ये मृत्यू होण्याचे प्रमाण वाढत असून ते थांबविण्यासाठी चालकांनी हेल्मेटचा वापर करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

टॅग्स :Accidentअपघात