शहरं
Join us  
Trending Stories
1
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
2
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
3
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
4
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
5
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
6
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
7
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
8
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
9
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
10
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
11
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
12
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
13
"राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
14
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
15
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
16
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
17
"भाऊ एक झाले की शहराला बळ येतं...", प्रसिद्ध मराठी लेखकाची ठाकरे बंधूंसाठी पोस्ट
18
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
19
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
20
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया

२८ कोटींच्या विकासकामांना विशेष महासभेत मंजुरी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 00:48 IST

ग्रामीण भागाच्या विकासासाठी भरीव तरतूद; प्रभाग समिती अ, ब आणि ड मधील कामे करण्यास प्राधान्य

लोकमत न्यूज नेटवर्क पनवेल : पनवेल महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांमध्ये प्राथमिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी व या गावांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी २८ कोटींच्या कामांना शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या विशेष महासभेत मंजुरी देण्यात आली. यामध्ये रस्ते, गटारे, समाज मंदिराचे सुशोभीकरण आदींसह विविध कामांचा समावेश आहे.पनवेल महानगरपालिकेची विशेष सर्वसाधारण दि. ८ रोजी आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात महापौर डॉ.कविता चौतमोल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यामध्ये पनवेल महानगरपालिका हद्दीतील प्रभाग समिती अ, ब आणि ड मधील गावातील विकासकामांना मंजुरी मिळाली आहे. यावेळी वेगवेगळ्या ९२ कामांना महासभेत मंजुरी देण्यात आली आहे. पनवेल महापालिकेच्या चार प्रभागांपैकी अ, ब आणि ड प्रभागामध्ये ही विकासकामे करण्यात येणार आहे. 

महापालिकेच्या प्रभाग क्रमांक अ मधील रोहिंजण, तुर्भे, धरणा कॅम्प, पापडीचा पाडा, खुटुंकबांधन, खुटारी, एकटपाडा, पडघे, आडिवली, इनामपुरी, तोंडरे, नागझरी, कोपरा, ओवे, पेंधर, धरणा, पेठ, तळोजा घोट, धामोळे आदी गावांमध्ये ६२ कामांचा समावेश आहे. प्रभाग क्रमांक ब मध्ये खिडुकपाडा, वळवली, टेंभोडे, आसुडगाव, कळंबोली, रोडपाली या गावांमध्ये २४ कामांचा समावेश आहे. तर, प्रभाग ड मध्ये सहा कामे करण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, या विकासकामांवर सत्ताधारी भाजपच्या नगरसेविका लीना गरड यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली. पालिकेचा निधी ग्रामीण भागासाठी वापरला जात आहे. हा दुजाभाव थांबणे गरजेचे असल्याचे लीना गरड यांनी सांगितले. विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी ही कामे तातडीने करून कामाचा दर्जा चांगला असल्याबाबत सूचना केल्या.यावेळी उपमहापौर जगदिश गायकवाड, सभागृहनेते परेश ठाकूर, अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, महिला व बाल कल्याण सभापती मोनिका महानवर माजी स्थायी समिती सभापती प्रवीण पाटील आदी उपस्थित होते. 

दुजाभाव थांबणे गरजेचे - लीना गरडविकास हा सर्वांगीण होणे गरजेचे आहे. शहरी भागात विकास कामे होत नसताना, नागरिकांवर मालमत्ता कराचा बोजा दिला दिला जात आहे, तर दुसरीकडे ग्रामीण भागात मालमत्ता कर न वाढवता, पालिकेचा निधी ग्रामीण भागासाठी वापरला जात आहे. हा दुजाभाव थांबणे गरजेचे असल्याचे सांगत, सत्ताधारी भाजपचा लीना गरड यांनी निषेध व्यक्त करीत भाजपला घरचा आहेर दिला

ग्रामीण भागाला मुख्य प्रवाहात आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. याकरिताच ही विकासकामे मंजूर करण्यात आलेली आहेत. आम्ही या विकासकामांचा दर्जा टिकून राहावा, याकरिता या कामांवर लक्ष ठेवणार आहोत.- परेश ठाकूर, सभागृह नेते