शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

पनवेलमध्ये 274 कुटुंबाचे वास्तव्य अतिधोकदायक इमारतीत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2024 00:02 IST

धोकादायक इमारती मधील रहिवाशांचा जीव टांगणीला.

वैभव गायकर,पनवेल: मुंबई आणि उपनगरात धोकादायक ईमारती पडून त्यात निष्पापांचा जीव जाण्याच्या घटना वारंवार घडतात.दरवर्षी या घटनेत वाढ होत असते मात्र या घटनांना पूर्णविराम मिळत नाही.पनवेल महानगरपालिका क्षेत्रात देखील शेकडो धोकादायक ईमारती घोषित केल्या आहेत.विशेष म्हणजे पालिकेने या ईमारती धोकादायक तर घोषित केल्या मात्र आजही या धोकादायक ईमारतीत शेकडो कुटुंब वास्तव्यास असल्याने भविष्यात याठिकाणी दुर्दैवी घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

पालिकेने या इमारतींची वर्गवारी केली आहे.या वर्गवारीत धोकादायक आणि अतिधोकादायक असे दोन भाग केले असून सर्वाधिक अतिधोकादायक आणि धोकादायक ईमारती पनवेल आणि कळंबोली शहरात आहेत.या 62 अतिधोकादायक ईमारतीत 274 कुटुंब वास्तव्यास आहेत.पनवेल शहरात जीर्ण व धोकादायक ईमारती कित्येक वर्षांपासून उभ्या आहेत.पनवेल नगरपरिषदेच्या काळापासून या ईमारती उभ्या आहेत.मध्यंतरी गणेश देशमुख पनवेल महानगरपालिकेचे अयुक्त असताना धोकादायक ईमारतीच्या पुनर्विकासाला गती मिळाली.पालिकेने धोकादायक ईमारतीवर बॅनर लावुन धोकादायक इमारतीच्या आवारात कोणी प्रवेश करू नये असे बॅनर लावले आहेत.मात्र या धोकादायक ईमारती पाडण्यासाठी पालिका प्रशासन पुढे का धजावत नाही.असा प्रश्न निर्माण झाला आहे.अतिधोकादायक ईमारती मध्ये खारघर मध्ये 3,कळंबोली मध्ये 180,कामोठ्यात 21 आणि पनवेल शहरात 70 कुटुंब अतिधोकादायक ईमारतीत वास्तव्यास आहेत.पालिकेने या ईमारतींची यादी जाहीर केली आहे.काही ईमारतींचे पाणी आणि वीज जोडणी देखील बंद करण्यास सुरुवात केली आहे. राजकीय हस्तक्षेप ? -पालिकेने धोकादायक म्हणुन घोषित केलेल्या ईमारतींची वीज,पाणी बंद केल्यावर काही रहिवासी राजकीय नेत्यांचा वजन वापरून वीज पाणी पूर्ववत करत आहेत.अशा ईमारतीत दुर्दैवी घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण ? अशाप्रकारे राजकीय हस्तक्षेप कितपत योग्य आहे.असा प्रश्न निर्माण झाला आहे. धोकादायक ईमारती पाडणार कोण ?-धोकादायक घोषित केलेल्या अनेक ईमारती रिकाम्या देखील झाल्या आहेत.या ईमारती पडण्याची वाट बघायची कि पालिका या ईमारती स्वतः पाडेल असा प्रश्न नागरिक विचारू लागले आहेत. धोकादायक ईमारतींची यादी जाहीर केली आहे.या ईमारती मधील घरे रिकामी करण्याचे अवाहन देखील रहिवाशांना केले आहे.तसेच या ईमारती मधील वीज पाणी जोडणी बंद करण्यास सुरुवात केली आहे.- मारुती गायकवाड (उपायुक्त्त,पनवेल महानगरपालिका )

टॅग्स :panvelपनवेल