शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हंटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
3
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
4
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
5
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
6
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
7
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
8
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
9
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
10
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
11
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
12
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
13
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
14
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
15
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
16
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
17
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
18
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
19
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?

२७ गावे महायुतीच्या विरोधात करणार मतदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2019 23:46 IST

संघर्ष समितीचा निर्णय. मानपाडेश्वर मंदिराच्या प्रांगणात सभा

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेत समाविष्ट केलेली २७ गावे वेगळी करून त्यांची स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्याचे आश्वासन राज्य सरकारने दिले होते. मात्र, ते पाळले नसल्याने महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात मतदान करण्याचा निर्णय २७ गावे सर्वपक्षीय संघर्ष समितीने घेतला आहे.

संघर्ष समितीची जाहीर सभा रविवारी मानपाडेश्वर मंदिराच्या प्रांगणात झाली. या सभेला समितीचे अध्यक्ष गंगाराम शेलार, उपाध्यक्ष गुलाब वझे, सरचिटणीस चंद्रकांत पाटील, पदाधिकारी अर्जुन चौधरी, बळीराम तरे, गजानन मांगरूळकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. या सभेत अध्यक्ष शेलार यांनी समितीच्या कोअर कमिटीने घेतलेला निर्णय ग्रामस्थांच्या सभेत जाहीर केला.

२७ गावे महापालिकेतून वेगळे करण्याचे आश्वासन आॅक्टोबर २०१५ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. त्यानंतरही त्यांनी वारंवार या आश्वासनाचा उच्चार केला. मात्र, त्याची पूर्तता आजपर्यंत केलेली नाही. २७ गावांना केवळ झुलवत ठेवले. यापूर्वी महापालिका निवडणुकीवर समितीने बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, हा बहिष्कार मोडीत काढण्याचे काम पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. उमेदवार त्यांनी उभे केल्याने समितीला बहिष्काराचा पवित्रा मागे घ्यावा लागला.

शिवसेना-भाजपाच्या मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांनी २७ गावांच्या डोळ्यांत धूळ फेकली आहे. आश्वासनांची पूर्तता केलेली नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराला २७ गावे मतदान करणार नाहीत. त्याऐवजी आघाडीचे उमेदवार बाबाजी पाटील यांना मतदान करण्याचे आवाहन समितीतर्फे करण्यात आले.

शेलार यांनी सांगितले, ‘भाल, भोपर आणि शीळ येथे डम्पिंग ग्राउंडचे आरक्षण आहे. सरकारने ते हटवले नाही. २७ गावांत अन्य भागांतील कचरा आणून २७ गावांतील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणण्याचा घाट सरकारने घातला आहे. २७ गावे महापालिकेत समाविष्ट केली, त्यापूर्वी ग्रामस्थांना ग्रामपंचायतीच्या राजवटीत जो मालमत्ताकर होता, तो नगण्य होता. आता महापालिकेने दहापटीने जास्त मालमत्ताकराची आकारणी केली आहे. कल्याण-शीळ रस्त्याचे सहापदरीकरण सुरू केले आहे. परंतु, या रस्त्यात बाधित असलेल्यांना अद्याप मोबदला दिला नसताना जबरदस्तीने प्रकल्पाचे काम केले आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांची नाराजी आहे.’बिल्डरांच्या फायद्यासाठी ग्रोथ सेंटरराज्य सरकारने बड्या बिल्डरांच्या फायद्यासाठी २७ गावांच्या परिसरात कल्याण ग्रोथ सेंटर आणले आहे. त्याला २७ गावांतील नागरिकांचा विरोध आहे. कल्याण-शीळ रस्त्यावरील वाहतूककोंडी सोडवण्यात सरकार अपयशी ठरलेले आहे. या विविध मुद्यांचा उल्लेख सभेत शेलार यांनी केला.

टॅग्स :maval-pcमावळ